Spectacle Mark esakal
आरोग्य

Spectacle Mark: चष्म्याचे वळ नाकावर पडल्याने लूक बिघडतोय? ट्राय करा या टिप्स...

नेहमी चष्मा वापरल्याने चेहऱ्यावर चष्म्याच्या खुणाही तयार होतात.. या टिप्स करतील मदत..

सकाळ डिजिटल टीम

Take Away The Spectacle Marks: सध्या सततच्या काॅम्प्युटरच्या कामामुळे लोकांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे, शिवाय चष्मा घालणे हा आज एक ट्रेंड झाला आहे. अनेकजण आपला लूक एन्हान्स करण्यासाठी चष्मा घालणे पसंत करतात. काही लोकं कॉम्प्युटरमुळे आपल्या डोळ्यांना त्रास नको म्हणून कॉम्प्युटर लेन्सचा चष्मासुद्धा वापरतात. 

नेहमी चष्मा वापरल्याने चेहऱ्यावर चष्म्याच्या खुणाही तयार होतात. अशा परिस्थितीत चष्म्याचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही काही सोप्या आणि घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकता. यामुळे तुमची त्वचा देखील उजळेल.

चष्म्यांचे डाग काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या मार्क्स रिमूव्हल क्रीम्स वापरतात. पण त्यानंतरही चष्म्याचे डाग पूर्णपणे पुसले जात नाही. या टिप्स वापरुन तुम्ही ते डाग काढू शकतात. 

१. संत्र्याची साले 

चेहऱ्यावरील चष्म्याचे डाग घालवण्यासाठी संत्र्याची साल वापरता येतात. यासाठी संत्र्याची साले उन्हात वाळवून बारीक करावी. आता या पावडरमध्ये अर्धा चमचा दूध मिसळून चेहऱ्याला लावा आणि काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहरा सुंदर आणि डागरहित दिसेल.

२. काकडी 

अँटी-ऑक्सिडंट घटकांनी युक्त काकडी डोळ्यांसाठी तर चांगली असतेच पण चेहऱ्यावरील डाग मिटवण्यासाठीही मदत करते. अशावेळी काकडी धुवून गोल कापून घ्या. आता काकडीचे काप डागावर ठेवा आणि काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चष्म्याचे चिन्ह कमी होईल आणि तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकेल.

३. लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करते. अशावेळी पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि काही वेळानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. त्यामुळे चष्म्यावरील डाग हळूहळू निघू लागतात.

४. बदामाचे तेल

बदामाचे तेल हे व्हिटॅमिन ई चा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. अशावेळी रोज झोपण्यापूर्वी बदामाचे तेल डागांवर  लावलं तर त्वचेवरील डाग तर दूर होतीलच पण तुमच्या चेहऱ्यावर चमकही येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT