how you express of your love if someone did not accept it sakal
आरोग्य

तुमची प्रेमाची अभिव्यक्ती

तुमचे कुणावर तरी खूप प्रेम आहे, पण ती व्यक्ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार करीत नाही. तुम्ही काय कराल?

श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

तुमचे कुणावर तरी खूप प्रेम आहे, पण ती व्यक्ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार करीत नाही. तुम्ही काय कराल?

तुमचे कुणावर तरी खूप प्रेम आहे, पण ती व्यक्ती तुमच्या प्रेमाचा स्वीकार करीत नाही. तुम्ही काय कराल?

  • निराश व्हाल.

  • प्रेमाचे द्वेषामध्ये रूपांतर करून सूड घेण्याची इच्छा कराल.

  • पुनःपुन्हा तुमचे किती अधिक प्रेम आहे आणि ती व्यक्ती किती कमी प्रतिसाद देते याची आठवण करून देत राहाल.

  • अति चिकित्साखोर आणि तऱ्हेवाईक वागाल.

  • उगाच क्रोध आणि त्राग्याचे प्रसंग घडवाल.

  • तुम्हाला अपमानित वाटेल आणि स्वतःचा सन्मान राखण्याचे प्रयत्न कराल.

  • पुन्हा कधी प्रेम न करण्याची प्रतिज्ञा कराल.

  • आपल्याला चांगली वर्तणूक मिळाली नाही असे समजून तुम्हाला दुःख होईल.

  • तुम्ही अलिप्त आणि बेपर्वा बनू पाहता.

परंतु यापैकी कोणत्याही प्रतिक्रियेचा काही उपयोग होत नसल्याचे तुमच्या ध्यानात आलेच असेल. उलट अशापैकी कोणत्याही वर्तनाने परिस्थिती आणखीच बिघडते.

मग या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे? तुमच्यातील प्रेमाची भावना शाबूत कशी ठेवायची?

संयम राखा.

  • एककेंद्रित राहा आणि तुमच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला एक मर्यादा असू द्या. काहीवेळा प्रेम अती व्यक्त केल्याने लोकांना अस्वस्थ वाटू शकते.

  • तुमची प्रेमाच्या अभिव्यक्तीची पद्धत बदलून पाहा.

  • ते तुमच्यावर प्रेम करतातच याची खात्री बाळगा. फक्त त्यांच्या अलग अभिव्यक्तीचा स्वीकार करा.

  • एखाद्या आईला तीन अशी मुले आहेत, की जी वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. एक खूप बोलते, एक बोलतच नाही आणि तिसरे सारखे हट्ट करीत असते. अशा वेळी ती आई तिन्हीही मुलांवर सारखेच प्रेम करते, त्यांची सारखीच काळजी घेते, होय ना?

  • त्यांच्या तुमच्यावरील प्रेमाची खरीखुरी पावती द्या. यामुळे तुमच्या अपेक्षांच्या जागी कृतज्ञता निर्माण होईल. आणि तुम्ही जीवनात जेवढे अधिक कृतज्ञ असाल, तेवढे अधिक प्रेम तुम्हाला लाभते.

  • यातना प्रेमामध्ये अपरिहार्य आहेत, हे ध्यानात असू द्या आणि त्यांची जबाबदारी घ्या.

    या जगामध्ये दुःख स्वाभाविक आणि कायम आहेच आणि तुम्ही एककेंद्रित, स्थिर नसाल, तर ते तुमच्या वाट्याला अधिक येते, याची जाणीव असू द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT