Low Blood Sugar esakal
आरोग्य

Low Blood Sugar : रक्तातील साखर अचानक कमी झालीय? मग, ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश

रक्तातील साखर अचानक कमी झाली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Low Blood Sugar : रक्तातील साखरेची पातळी जास्त झाल्यावर म्हणजेच डायबिटीज झाल्यावर आपण सर्वजण त्याबद्दल चर्चा करतो. त्यावर उपचार घेतो, अधिक माहिती घेतो. भारतात मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे.

परंतु, रक्तातील साखर अचानक कमी होणे, हे देखील चांगले नाही. रक्तातील साखर अचानक कमी झाली की, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. रक्तातील साखर वाढू ही द्यायची नाही आणि अगदी कमी ही होऊ द्यायची नसेल, तर रक्तातील साखरेचे योग्य संतुलन असणे गरजेचे आहे.

रक्तातील साखरेचे योग्य संतुलन राखण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा आहारात समावेश करावा लागेल. कोणत्या आहेत या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

दूध

रक्तातील साखर अचानक कमी झाल्यानंतर दुधाचे सेवन अवश्य करा. दुधाचे सेवन केल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. शिवाय, दूधामध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते.

दुधाचे सेवन करताना तुम्हाला हवे असल्यास आणि ऊर्जेची कमतरता जाणवत असल्यास दुधात अर्धा चमचा साखर मिसळू शकता.

मध

रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी मध देखील महत्वपूर्ण आहे. मात्र, याचे जास्त सेवन करणे योग्य नाही. यासाठी तुम्ही १ चमचा मध आणि फळांचा जॅम एकत्रितपणे स्नॅकसारखा खाऊ शकता. यामुळे, रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढण्यास मदत होईल. लक्षात ठेवा, मध जास्त प्रमाणात घेऊ नका.

कार्ब्स रिच डाएटचा आहारात समावेश

काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते रक्तातील अचानक कमी झालेल्या साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी फक्त गोड पदार्थ किंवा मिठाईच खाल्ली पाहिजे असे काही नाही. उलट अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मुबलक प्रमाणात कर्बोदकांचा आहारात समावेश करू शकता.

यासाठी, आहारात बटाटा, ब्रेड, पालेभाज्या, बीन्स, मका इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता. हे सर्व हाय कार्ब्स (कर्बोदके) आहेत, ज्यामुळे, तुमच्या रक्तातील साखरेचे योग्य संतुलन राहण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT