blood pressure sakal
आरोग्य

Health Tips: तुम्हालाही लो बीपीचा त्रास असेल तर ‘या’ गोष्टी नक्की खा

आज आम्ही तुम्हाला अशा कोणत्या गोष्टींचे सेवन करून लो बीपी नियंत्रित करू शकता हे सांगणार आहोत.

Aishwarya Musale

चुकीचे खाणेपिणे आणि बैठी जीवनशैली यामुळे आजकाल कमी रक्तदाबाची समस्या सामान्य झाली आहे. पण हे आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. अचानक कमी रक्तदाबामुळे चक्कर येणे, अशक्तपणा, बेशुद्ध होणे आणि श्वासाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

कमी रक्तदाबाच्या समस्येमध्ये खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. काही पदार्थांचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्यास देखील मदत होते. अशा कोणत्या गोष्टींचे सेवन करून लो बीपी नियंत्रित करू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

लो बीपी असताना खा ‘या’ गोष्टी

कॉफी-

लो बीपीची जर तुम्हाला समस्या असेल तर कॉफीचे सेवन करावे. यामध्ये असलेले कॅफिन रक्तदाब वाढवण्यास मदत करते. तसेच तुमचा जर बीपी अचानक कमी झाला असेल तर लगेच कॉफीचे सेवन करावे. हे केल्याने तुमचा बीपी नियंत्रित राहील. तुम्ही यासाठी ब्लॅक कॉफी पिऊ शकता. तसेच यामुळे हृदयाचे ठोके वाढण्यास देखील मदत होते.

अंडी

आपल्या आरोग्यासाठी अंड्याचे शेलिंग खूप चांगले आहे. कारण यामध्ये प्रोटीन, फोलेट आणि लोह असते जे लो बीपीची समस्या दूर करण्यास मदत करते. तुम्ही लो बीपीमध्येही अंड्याचे देखील सेवन करू शकता.

डार्क चॉकलेट-

डार्क चॉकलेट चवीला कडू असते, पण लो बीपी असणाऱ्यांनी याचे सेवन करावे. कारण डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तुमचा बीपी जर अचानक कमी झाला असेल तर तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता.

पनीर

कमी प्रमाणात पनीर खाणे फायदेशीर ठरते. तुमचा बीपी जर नेहमीच कमी असेल तर दररोज तुम्ही पनीरचे सेवन करायला पाहिजे. पनीरमध्ये तुम्ही मीठ चाट मसाला वगैरे घालून खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT