superfood
superfood sakal
आरोग्य

Thyroid नियंत्रित करू इच्छिता? ट्राय करा 'हे' पाच सुपरफूड

सकाळ डिजिटल टीम

थायरॉईडचा आजार ही आजच्या जगात एक सामान्य समस्या आहे. आपल्या देशात दररोज हजारोच्या संख्येने थायरॉईडच्या पेशंटची अनेक प्रकरणे नोंदवली जातात. थायरॉईड आजारावरील विविध अभ्यासांच्या अंदाजानुसार, भारतातील सुमारे ४२ दशलक्ष लोक थायरॉईड आजाराने ग्रस्त आहेत. महिलांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. थायरॉईड ही संप्रेरक नियामक ग्रंथी आहे. यातील असंतुलनामुळे हार्मोन्स मध्ये कमी-जास्त प्रमाणात सतत बदल होतात. (Healthy Lifestyle)

थायरॉईडची सामान्य पातळी ही ०.४ - ४.० mIU/L दरम्यान असते. समजा जर ही पातळी २.० पेक्षा जास्त असेल तर त्याला हायपो-थायरॉईडीझम म्हणतात. जर पातळी २.० कमी असेल तर त्याला हायपर-थायरॉईडीझम म्हणतात.आपल्याला थायरॉईड आहे हे सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवता येते आणि त्यातून सुटकाही होऊ शकते. जर उशिरा कळले तर औषधी दीर्घकाळ घ्यावी लागते. (if you want to control thyroid try these superfood)

आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसारणा यांनी थायरॉईड आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी काही आहाराविषयी माहिती दिली आहे. हा आहार एखाद्या सुपरफूडसारखच काम करतो असं त्यांचं मत आहे.

थायरॉईडच्या आजार झालाय हे कस कळतं?

तुमचे वजन वाढणे, अंगावर सूज येणे, घसा कोरडा पडणे, सतत मूड बदलणे, केस गळणे, प्रचंड अशक्तपणा येणे, चिडचिड होणे, निद्रानाशेची समस्या निर्माण होणे, त्वचा कोरडी पडणे, अचानक थंडी वाजणे या सर्व गोष्टी तुम्हाला इशारा देतात की तुम्हाला थायरॉईडची सुरुवात होत आहे.

तुम्ही तुमचे थायरॉईड नियंत्रित करू इच्छिता? आजपासून हे ५ सुपरफूड खाणे सुरू करा, काही दिवसातच तुम्हाला परिणाम दिसून येईल.

थायरॉईड हे तुमच्या हृदयाच्या गतीसह शरीराची कार्ये सामान्य ठेवण्याचे काम करते. त्याच वेळी, जेव्हा तुमच्या थायरॉईड ग्रंथीत असंतुलन निर्माण होते, तेव्हा आपोआप तुमच्या हृदयाची गती वाढते. थायरॉईड ग्रंथीने व्यवस्थित काम करण्यासाठी तुमच्या शरीरात लोह, मॅग्नेशियम, आयोडीन, जस्त, जीवनसत्त्वे बी, सी, डी आणि सेलेनियमची आवश्यकता असते. हे सर्व घटक तुम्ही संतुलित आहारातून मिळवू शकता.

1)आवळा

आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा ८ पट जास्त व्हिटॅमिन सी आणि डाळिंबापेक्षा १७ पट जास्त व्हिटॅमिन सी असते. केसांसाठी सुध्दा आवळा हे टॉनिक आहे. तसेच, जर तुमची थायरॉईड ग्रंथी अतिक्रियाशील झाली असेल, तर आवळा थायरॉईड संप्रेरकांना नियंत्रित करून आराम देण्याचे काम करते.

2) ब्राझील सुपारी

सेलेनियम हे एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे शरीरातील थायरॉईड संप्रेरकांच्या चयापचयासाठी आवश्यक आहे. टी ४ ते टी ३ चे रूपांतर करण्यासाठी सेलेनियम आवश्यक आहे आणि ब्राझील सुपारी हे या पोषक तत्वाचे सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहेत. खरं तर, दिवसातून तीन वेळा तुम्ही थोडी थोडी ब्राझील सुपारी खावी. कारण त्यातील अँटिऑक्सिडंट हे थायरॉईडला खनिजांचा योग्य मात्रा देण्यासाठी पुरेसे आहेत. यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाणही जास्त असते

3)भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया या मॅग्नेशियम आणि झिंकचा समृद्ध असा स्रोत आहे. विशेषतः झिंक शरीराला इतर जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेण्यास मदत करते. याशिवाय ते शरीरात थायरॉईड संप्रेरकांचे संतुलन नियंत्रित करतात.

4) नारळ

थायरॉईड रुग्णांसाठी नारळ हे एक उत्तम घटक आहे, मग ते कच्चे नारळ असो किंवा खोबरेल तेल. हे पचनप्रकियेतील असंतुलन सुधारण्यासाठी कार्य करते.

5) मूग दाळ

बीन्समध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. मूगाची दाळ ही आयोडीन प्रदान करते आणि मूगाच्या दाळीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती पचण्यास हलकी असते. म्हणूनच थायरॉईड नियंत्रित राहण्यासाठी आहारात मूगाच्या दाळीचा समावेश करावा.

सोबतच मटार, पालेभाज्या, बेरी, गाईचे दूध, ताक यांचा आहारात समावेश केला तर तो थायरॉईड रुग्णांसाठी सुपरफूड्स ठरु शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी अन् प्रफुल्ल पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला - संजय राऊत

SCROLL FOR NEXT