Actress Ruchita Jadhav sakal
आरोग्य

नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त आणि नियमितता. पूर्वी मी सडपातळ होते. जवळपास दहा ते पंधरा वर्षे डाएटिंगवर होते.

रुचिता जाधव, अभिनेत्री

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त आणि नियमितता. पूर्वी मी सडपातळ होते. जवळपास दहा ते पंधरा वर्षे डाएटिंगवर होते. मात्र, आमचे कुटुंब खवय्ये असल्यामुळे मी वेगवेगळे पदार्थ आणि जंक फूड खायला लागले. त्याचा परिणाम माझ्या शरीरावर झाला. त्यामुळे मी पुन्हा डाएट सुरू केले आहे.

मी रोज पाच-साडेपाचच्या दरम्यान उठते. त्यानंतर दररोज न चुकता चालायला जाते. कधी-कधी सकाळी वेळ मिळाला नाही किंवा काही अडचण असल्यास संध्याकाळी चालायला जाते. चालल्यामुळे पूर्ण शरीराची हालचाल होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्या गोष्टींचा मला त्रास होईल, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. माझ्यामध्ये ग्रॅटिट्यूड खूप आहे. मी दिवसातून अनेक जणांना थँक्यू म्हणत असते.

एखाद्याचे आभार मानल्यावर त्याला होणारा आनंद आणि आपल्याला मिळणारे समाधान खूप वेगळे असते. माझ्या आई-वडिलांमुळे माझ्यात तो गुण रुजला आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी मी जिममध्ये जाते. त्यामुळे माझे वाढलेले वजन मी सहा किलोने कमी करू शकले. ज्या दिवशी मला जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही, त्या दिवशी मी पायी चालण्यावर भर देते. कायम सकारात्मक विचार करते.

माझ्या पूर्ण डाएटचे मी रोज सकाळी नियोजन करते. उठल्यावर प्रथम गरम पाणी पिते. सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान नाश्ता करते. रोज दहा वाजता मला कॉफी हवीच असते. मी दिवसातून दोन वेळा कॉफी पिते. दुपारी एकच्या दरम्यान जेवण करते. त्यामध्ये रोज भाकरी, काकडी, टोमॅटो व सात्त्विक पदार्थांचा समावेश असतो. मी मांसाहारी पदार्थांची चाहती आहे.

माझ्या घरच्या कूक वेगवेगळे पदार्थ बनवत असतात. त्यामुळे मी बाहेरचे पदार्थ टाळते. रात्री आठ वाजता हलके जेवण करते. त्यामध्ये डोसा, इडली-सांबर अशा पदार्थांचा समावेश असतो. रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास झोपते. त्यामुळे माझी झोप पूर्ण होऊन सकाळी फ्रेश वाटते. शरीराला फायबर मिळण्यासाठी सॅलड, ड्राय फ्रूट्स नियमितपणे खाते.

प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते. त्यानुसार आपण आपले आहाराचे, व्यायामाचे, झोपण्याचे अन् कामाचे वेळापत्रक बनवले पाहिजे. कारण, फिटनेस हा जीवनशैलीचा भाग आहे. तुम्ही तुमची जीवनशैली बदला, वेगवेगळे नियम आपल्यासाठी घालून घ्या आणि त्यानुसार अनुकरण केल्यास नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यभर व शरीरावर होईल.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स

  • मानसिक आरोग्यासाठी त्रासदायक ठरणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

  • आपले आरोग्य तंदुरुस्त राहिले तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होतो. त्यामुळे आपणच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

  • दिवसभराचे नियोजन करून त्यामध्ये नियमितता ठेवावी. त्यामुळे आपली धावपळ न होता आपली मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.

  • हारामध्ये पालेभाज्या, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये, दूध, फळे आणि सात्त्विक पदार्थांचा समावेश असावा.

  • आपण आपल्या शरीरासाठी दिवसातून अर्धा ते एक तास तरी दिला पाहिजे. चालणे, सायकलिंग, जिममध्ये किंवा घरी व्यायाम, योगासने किंवा ध्यानधारणा केलीच पाहिजे.

(शब्दांकन : अश्विनी इचके)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Japan PM Resign : जपानमध्ये राजकीय भूकंप, पक्षात फूट पडू नये म्हणून पंतप्रधानांचा राजीनाम्याचा निर्णय

"तू हिरोईन मटेरियल नाहीस.." मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्रीला आला वाईट अनुभव; "आता मला फरक.."

Archery World Championships: भारतीय तिरंदाजी संघाचा सुवर्णवेध! जागतिक स्पर्धेत गोल्ड मेडलसह घडवला इतिहास

Latest Maharashtra News Live Updates: पुरंदरमध्ये विमानतळ प्रकल्पाला ग्रामस्थांचा जोरदार विरोध, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

Pune Ganesh Visarjan : पुण्यात गणपती मंडळांपुढे पोलिस हतबल, कार्यकर्त्यांनी भर गर्दीत उडविलले फटाके, विसर्जन मिरवणूक रेंगाळली

SCROLL FOR NEXT