Amazing Benefits of Tadasana: योग्य व्यायाम, योग्य प्रमाणात व नित्य नियमाने केल्यास निरोगी आयुष्य जगता येते. आसने व प्राणायाम या योगिक क्रियांमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते. तसेच बौद्धिक विकासही होतो.
आसने करताना वाकणे, उचलणे आणि वळवणे या शारीरिक हालचाली होतात. त्या करताना थोडा ताण पडेल तेथेच थांबावे. सर्व हालचाली अगदी सावकाश कराव्यात. "यथाशक्ती निरंतरम्' योगाभ्यास करणे म्हणजे नियमितपणे पूर्ण शक्ती वापरून आसने करणे.
ताडासनाची स्थिती: ताठ उभे राहणे.
(1) दोन्ही हातांच्या बोटांमध्ये ताण घेऊन दंड कानाला लागेपर्यंत हात डोक्यावर ताणा.
(2) टाचा उचला. संपूर्ण शरीर वर ताणा. पूर्णस्थिती.
(3) टाचा जमिनीवर टेकवा.
(4) हातातील बोटांचा ताण कायम ठेवत हात सावकाश खाली आणावेत. पूर्वस्थिती.
3 मिनिटे
- उंची वाढते. पोट पातळ होते.
- लठ्ठपणा दूर होतो.
- मेरूदंड आणि हृदयाची शक्ती वाढते.
- शरीर सुडौल सडपातळ बनते.
- कंबर आणि गुडघ्यांमध्ये म्हातारपणातही वाक किंवा पोक येत नाही.
- छाती उठावदार होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.