H3N2 Symptoms esakal
आरोग्य

H3N2 Symptoms : सर्दी खोकला अन् घशात खवखवीचा त्रास असेल तर...भारत सरकारने दिली या व्हायरसची माहिती

मागील काही दिवसांपासून देशात इन्फ्लूएन्झाचे रूग्ण वाढले आहेत

सकाळ ऑनलाईन टीम

H3N2 Symptoms : मागल्या काही दिवसांपासून तुम्ही सर्दी, खोकला, ताप आणि घशात खवखवीच्या त्रासाने अनेकांना त्रस्त बघितले असेल. मात्र हा साधासुधा सर्दी खोकला नसून इन्फ्लूएन्झा आहे. मागील काही दिवसांपासून देशात इन्फ्लूएन्झाचे रूग्ण वाढले आहेत. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत.

या इनफ्लूएन्झामुळे श्वसनासंबंधित समस्या (respiratory illness) निर्माण होतात. हा इनफ्लूएन्झा ए सबटाइप एचथ्रीएनटू (H3N2) (Influenza subtype A H3N2) प्रकारातील आहे. आयसीएमआरच्या वीआरडीएलएस नवाच्या सर्वेक्षणामध्ये 15 डिसेंबरपासून आतपर्यंत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये श्वसनासंदर्भातील संसर्ग झालेले (सार्क) आणि आऊट पेशंट इन्फ्लूएन्झा सारखे H3N3 पद्धतीच्या संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. वायू प्रदुषणामुळे लोकांमध्ये श्वसन संस्थेच्या सुरुवातीच्या भागाला इनफेक्शन होण्याबरोबरच तापाचंही लक्षण दिसून येतं.

या व्हायरसची लक्षणे काय?

- खोकला

- अस्वस्थ वाटणं

- उलट्या होणं

- घशात खवखव

- अंगदुखी

- बद्धकोष्ट

असे करा व्हायरसपासून स्वत:चा बचाव

नियमितपणे तुमचे हात पाय साबणाने स्वच्छ धुवा. तसेच यापैकी कुठलेही लक्षणे दिसल्यास मास्क वापरणं सुरू करा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार आपल्या तोंडाला आणि नाकाला हात लावू नका. खोकताना आणि शिंकताना तुमचे नाक आणि तोंड रूमालाने झाका. हायड्रेट राहाण्यासाठी द्रव पदार्थांचं सेवन करा. ताप आणि अंगदुखी वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामॉल खाऊ शकता. (Health)

खोकला जास्त असल्यास डॉक्टरांच्या औषधाबरोबरच घरघुती काढासुद्धा पित राहा. त्याने तुम्हाला बरे वाटेल. या तापात डॉक्टर घरी राहाण्याचा सल्ला देतात. कारण तुमच्या खोकण्या शिंकण्यातून हा आजार दुसऱ्यांनाही होऊ शकतो. तेव्हा तुम्ही या व्हायरसच्या संपर्कात आल्यास घरी राहावे.

औषधांचा डोज वेळीच पूर्ण करावा. विक्सचा वाफारा घ्यावा. आणि सुरक्षित राहावे. काही दिवस बाहेरचं अजिबात काही खाऊ नका. बाहेरचं खाल्ल्याने तुमचं आरोग्य आणखी बिघडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: सूर्यकुमार यादवने जिंकला टॉस; संजू सॅमसन-बुमराहला मिळाली संधी? पाहा प्लेइंग-११

Central Railway: फुकट्यांना मध्य रेल्वेचा दणका! ५ महिन्यांत १७ लाख प्रवासी पकडले, १०० कोटींचा दंड

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT