Morning Drink for Changed Weather sakal
आरोग्य

Morning Drink for Changed Weather: बदलत्या वातावरणामुळे सतत सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? मग सकाळच्या कॉफीऐवजी प्या 'हे' पेय

Lemon And Clove Water: तुम्हाला खोकला, सर्दी किंवा घशाचा संसर्ग होत असेल तर हे मिश्रण सुमारे एक आठवडा ते दहा दिवस सेवन केले जाऊ शकते

सकाळ डिजिटल टीम

थोडक्यात:

  1. सर्दी, खोकला आणि घशाच्या त्रासावर लिंबू-लवंगाचे कोमट पाणी प्रभावी घरगुती उपाय ठरतो.

  2. या पेयामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, श्वसनमार्ग स्वच्छ राहतो आणि शरीरात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढते.

  3. सकाळच्या कॉफीऐवजी हे कमी कॅलरीचे पेय घेतल्यास आरोग्याला फायदा होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.

Lemon and Clove water for cough and cold: बदलत्या वातावरणामुळे सर्दी आणि घसा खवखवू शकतो. तुमचे नाक जर सतत वाहत असेल आणि घसा खवखवत असेल तर सकाळी झोपेतून उठायलो नको वाटते. तसेच जर अशक्तपणा असेल तर दिवसभर काम करणे थकवणारे असते. यासाठी सकाळी चहा किंवा कॉफी घेणे टाळावे. त्याऐवजी एक घरगुती उपाय करणे जास्त परिणामकारक ठरते.

रोज सकाळी लिंबू व लवंगाचे कोमट पाणी प्यायलाने सर्दी आणि खोकला नाहीसा व्हायला मदत होते. हे पेय सर्दी आणि खोकलयाची लक्षणे तसेच वजन कमी करण्यात मदत करते.

लिंबू आणि लवंग का वापरावे ?

लिंबामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते , जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि नाक मोकळे होण्यास मदत करते. तर लवंगामध्ये जळजळ कमी करणारे आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. त्यात युजेनॉल आणि गॅलिक ॲसिड सारखे पोशक घटक असतात, जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि पेशींचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात.

लवंग खाल्ल्याने घशातील खवखव कमी होते, ज्यामुळे श्वासोच्छवास सुरळीत होतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच सर्दी आणि खोकला झाला असता वेळेस श्वासोच्छवासास मदत व्हावी म्हणून श्वसनमार्ग साफ करण्यासाठी लवंग खाणे फायदेशीर ठरते.

सकाळच्या कॉफीऐवजी लिंबू- लवंगाचे पाणी

सकाळी कॉफी प्यायल्याने आपल्याला प्रफुल्लित आणि उत्तेजित वाटते, परंतु त्याऐवजी लिंबू आणि लवंगाचे कोमट पाणी पिण्याचे काही उत्तम फायदे आहेत. दूध आणि साखर असलेल्या एका सामान्य कॉफीमध्ये सुमारे 100-120 कॅलरीज असतात, तर लिंबू आणि लवंगाच्या पाण्यात, फक्त एक चमचा मधासह सुमारे 20 कॅलरीज असतात.

कॅलरीजचे सेवन कमी करणे हे तुमचे ध्येय असेल तर हे पेय मदत करू शकते. शिवाय लिंबू आणि लवंगाचे पाणी घशाला आराम देणारे असते. तुम्हाला फ्लू झाला असेल किंवा घास खवखवत असेल तेव्हा हे पाणी पिणे उपयोगी ठरते.

असे बनवा लिंबू आणि लवंगाचे पाणी

लवंग उकळवा: लवंग पाण्यात टाका आणि व्यवस्थित उकळून घ्या.

पाणी सर्वसाधारण तापमानाला येऊ द्या: लिंबाचा रस आणि मध घालण्यापूर्वी पाणी सर्वसाधारण तापमानाला थंड होऊ द्या. व्हिटॅमिन सी टिकवून ठेवण्यासाठी आणि कडूपणा टाळण्यासाठी पाणी गरम असताना लिंबू पिळणे टाळा.

मध घाला: चवीसाठी एक चमचा मध पाण्यामध्ये मिक्स करा.

किती वेळा हे पेय प्यावे?

जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असेल तर साधारण एक आठवडा ते दहा दिवस दररोज हे पेय प्या.

पावसाळ्याच्या दिवसात तरतरीत वाटावं म्हणून बरेचजण चहा किंवा कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन करतात जे शरीरासाठी घातकही ठरू शकते. त्याऐवजी जर लिंबू आणि लवंगाचे पाणी प्यायले तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, तसेच स्वास्थ्यसंबंधी समस्या कमी होतात आणि तुमच्या नेहमीच्या कॉफी किंवा चहाला देखील हे पेय पूरक ठरू शकते.

हे पेय पिणे कोणी टाळावे?

हे पेय बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असले तरी, पेप्टिक अल्सर, अन्ननलिका समस्या किंवा लिंबूसाठी घशाची संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींनी हा उपाय काळजीपूर्वक वापरावा. तसेच मध घातल्याने लिंबाच्या आंबटपणाचा सामना करण्यास मदत होते.

FAQs

  1. लिंबू-लवंगाचे पाणी कशासाठी उपयुक्त आहे? (What is lemon and clove water good for?)
    - सर्दी, खोकला, घसा खवखवणे, वजन कमी करणे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे पेय उपयुक्त आहे.

  2. हे पेय कधी प्यावे आणि किती वेळा? (When and how often should I drink lemon and clove water?)
    - सकाळी उपाशीपोटी दररोज एक आठवडा ते दहा दिवस हे पेय घेणे फायदेशीर असते.

  3. हे पेय सगळ्यांसाठी सुरक्षित आहे का? (Is this drink safe for everyone?)
    - बहुतांश लोकांसाठी सुरक्षित असले तरी पेप्टिक अल्सर, अन्ननलिकेच्या तक्रारी किंवा लिंबूसाठी संवेदनशीलता असलेल्यांनी ते टाळावे.

  4. कॉफीऐवजी हे पेय का निवडावे? (Why choose this drink instead of coffee?)
    - हे पेय कमी कॅलरीयुक्त असून ते शरीरात नैसर्गिक ऊर्जास्रोत पुरवते आणि सर्दी-खोकल्यावर प्रभावी असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नात्याला काळिमा फासणारी घटना! सावत्र मुलीवर बापाने केला बलात्कार; 18 आठवड्यांची राहिली गर्भवती, कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा

Viral Video: अभिनय असा केला, की...! पाकिस्तानच्या Iftikhar Ahmed चे समालोचकांनी काढले वाभाडे

Latest Maharashtra News Updates : कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ७ लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त

Google आणि Metaला EDची नोटीस, ऑनलाइन जुगार अ‍ॅप्स प्रकरणी चौकशी होणार

PM Narendra Modi: ‘आरजेडी’ने जमिनी बळकावल्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका, ‘नया बिहार बनायेंगे’ची घोषणा

SCROLL FOR NEXT