Diet for weight loss Sakal
आरोग्य

No diet Day : वजन कमी करण्यासाठी मन मारू नका; बिनधास्त खा पण या टिप्स फॉलो करा...

वजन कमी करायचं म्हणजे हे नको, ते नको, यात कॅलरी जास्त, यात फॅट जास्त असं म्हणत मोजून मापून खाल्लं जातं.

वैष्णवी कारंजकर

आपलं शरीर सुडौल असावं, बांधा आकर्षक असावा, असं कोणाला वाटत नाही? मग त्यासाठी सुरू होतात प्रयत्न आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे डाएट. हे नको, ते नको, यात कॅलरी जास्त, यात फॅट जास्त असं म्हणत मोजून मापून खाल्लं जातं. पण तुम्हाला माहित आहे का आंतरराष्ट्रीय स्तरावर नो डाएट डे सेलिब्रेट केला जातो?

'नो डाएट डे'चं महत्त्व काय?

दरवर्षी ६ मे रोजी आंतरराष्ट्रीय नो डाएट डे साजरा केला जातो. आहारावर कोणतीही बंधनं न घालता आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अशा काही सवयी लावण्याला प्रोत्साहन दिलं जातं की ज्यांचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. पण खाण्यापिण्यावर बंधनं येणार नाही.

निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्‍याचा उद्देश फक्त शरीराचा आकार कमी करणे असा नसतो सर्वांगीण आरोग्याला चालना देणाऱ्या सवयी अंगीकारणे आहे. आत्मप्रेम आणि स्वतःची काळजी घेण्यालाही हा दिवस प्रोत्साहन देतो. शारिरीक, मानसिक, आरोग्यासाठी हे आवश्यक असते.

व्यक्तींना संतुलित आहार राखण्याचे महत्त्व आणि वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया आणि खाण्याचे धोके याबद्दल जागृत केलं पाहिजे. जर तुम्ही आहार न घेता वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर सुरुवात करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स येथे आहेत.

मन लावून खा

लक्षपूर्वक खाल्लं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या अन्नाचा आस्वाद घेता येईल. तसंच किती आणि काय खाताय याच्यावरही नियंत्रण ठेवता येईल. संशोधनातून आढळून आलं आहे की ज्या लोकांचं जेवताना लक्ष नसतं, ते त्यांच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरी खातात.

तुम्ही काय खाता याची नोंद ठेवा

तुमच्या अन्नाची नोंद ठेवल्याने तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल अधिक जागरूक होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही काय खाता, कधी खाल्लं आणि किती खाल्लं याचा मागोवा घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू शकता.

हायड्रेटेड रहा

भरपूर पाणी प्यायल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि जास्त खाण्याची शक्यता कमी होते. हे तुमचं शरीर हायड्रेटेड ठेवण्यास आणि तुमचं एकूण आरोग्य सुधारण्यास देखील मदत करू शकते. जलद आणि नैसर्गिक वजन कमी करण्यासाठी, दिवसातून किमान ८ ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरतेमुळे तुमची चयापचय क्रिया विस्कळीत होऊ शकते आणि तुमची भूक हार्मोन्स वाढवू शकतात. अभ्यास सांगतो की रात्रीची झोप हे वजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून, रात्री किमान 7-8 तास झोपायला हवं.

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम केल्याने तुम्हाला कॅलरी बर्न करण्यात, स्नायू तयार करण्यात आणि तुमचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. वेगाने चालणं, सायकलिंगची मदत होऊ शकते.

प्रक्रिया केलेले अन्न टाळा

अन्न काळजीपूर्वक निवडल्याने तुम्हाला जास्त काळ पोटभर वाटू शकते, जास्त खाण्याची शक्यता कमी होते. मासे, मांस, भाज्या, फळे, बिया आणि शेंगा यासारखे संपूर्ण पदार्थ खाणे हे उत्कृष्ट पर्याय आहेत. कारण हे पदार्थ प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा अधिक पौष्टिक असतात, जे तुमचे एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात आणि तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतात.

पोर्शन कन्ट्रोल

पोर्शन कन्ट्रोल म्हणजे जेवताना लहान ताट आणि वाट्या वापरणे. संशोधनात असं दिसून आलं आहे की लहान भांडी वापरल्याने जेवणाचं प्रमाण कमी करण्यात आणि जास्त खाणं टाळण्यास मदत होते. दिवसभर कमी भाग अन्न खाल्‍याने वजन योग्य ठेवण्यात आणि तुमची चयापचय क्रिया चांगल्या प्रकारे चालू ठेवण्‍यात मदत होते.

या काही टिप्स तुम्हाला आहारावर बंधनं न आणता नैसर्गिकरित्या वजन कमी करता येऊ शकतं.

(हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT