Iron Deficiency esakal
आरोग्य

Iron Deficiency : शरीरात होऊ देऊ नका लोहाची कमतरता, होऊ शकतात हे 4 गंभीर आजार

शरीरात लोहाची कमतरता उद्भवल्यास कोणकोणते आजार तुम्हाला होऊ शकतात ते जाणून घेऊयात

साक्षी राऊत

Iron Deficiency : लोह आपल्या शरारीसाठी फार आवश्यक आहे. लोहामध्ये शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व असतात जे शरीराची अनेक आजारांपासून रक्षा करतात. शरीरात लोहाची कमतरता झाल्यास अशक्तपणा जाणवतो. आणि त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनही कमी होऊ लागते.

तेव्हा तुमच्या आहारात नियमित लिंबू, पालक, बीट, पिस्ता, पेरू, केळी आणि अंजीरसारख्या पदार्थांचा समावेश करून घ्या. शरीरात लोहाची कमतरता उद्भवल्यास कोणकोणते आजार तुम्हाला होऊ शकतात ते जाणून घेऊयात.

लोहाची कमतरता झाल्यास....

१. अॅनिमिया

शरीरात लोहाची कमतरता झाल्यास अॅनिमियाची समस्या उद्भवते. हा एक असा आजार आहे जो शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे होतो. ही समस्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. तेव्हा रोज असे पदार्थ आवर्जून खावे जे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता भरून काढेल.

२. अशक्तपणा

जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन तयार होत नाही. त्यामुळे भरपूर प्रमाणात झोप घेऊनही अशक्तपणा जाणवतो. अशक्तपणामुळे जास्त थकवा जाणवतो आणि आपल्या दैनंदिन कामात लक्ष लागत नाही. (Disease)

३. हृदयविकार

आरोग्याची योग्य काळजी न घेतल्याने हल्ली अनेक लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे रक्तपुरवठा नीट होत नाही. त्यामुळे विविध अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठासुद्धा सुरळीत होत नाही. ज्यामुळे हृदयावर ताण पडतो. आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. (health)

४. हेअर आणि स्किन डिसीज

लोहाची शरीरात कमतरता झाल्यास स्कीनच्या समस्यासुद्धा वाढतात. उदा. चेहऱ्यावर डाग, त्वचा ड्राय होणे, त्वचेचा रंग डल पडणे, त्वचा निर्जिव होणे. याशिवाय केस गळणे आणि डँड्रफच्या समस्याही वाढतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT