Tea Vs Coffee esakal
आरोग्य

Tea Vs Coffee : चहा पिणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर की कॉफी? ९९% लोकांना याचे उत्तर नाही माहित

Drinking tea or coffee is more beneficial for health? अनेकांना चहा प्यायला जास्त आवडतो तर काहींना कॉफी प्यायला जास्त आवडते. आपल्या देशात तर चहा हा सर्वाधिक प्रमाणात प्यायला जातो. मात्र, आता कॉफीप्रेमींची संख्या देखील वाढत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Tea Vs Coffee : जगभरात कॉफी आणि चहाचे शौकिन असंख्य आहेत. अनेकांना चहा प्यायला जास्त आवडतो तर काहींना कॉफी प्यायला जास्त आवडते. आपल्या देशात तर चहा हा सर्वाधिक प्रमाणात प्यायला जातो. मात्र, आता कॉफीप्रेमींची संख्या देखील वाढत आहे. केवळ आपल्या देशातच नाही तर जगभरात कॉफी आणि चहाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.

कोट्यावधी लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात ही चहा किंवा कॉफीच्या सेवनाने करतात. अनेक जण चहाला आरोग्यासाठी फायदेशीर मानतात तर काही जण कॉफीला आरोग्यासाठी फायदेशीर मानतात.

मात्र, या दोन्हींपैकी कोणते पेय हे आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर आहे? याचे उत्तर अनेकांना माहित नाही. आरोग्य तज्ज्ञांना देखील या प्रश्नाचे योग्य उत्तर देता येत नाही. आज आपण चहा आणि कॉफीपैकी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय आहे? ते जाणून घेणार आहोत.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, चहा आणि कॉफीवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून वेगवेगळी तथ्ये समोर आली आहेत. एका अभ्यासानुसार, कॉफीमध्ये सर्वात जास्त फायबर्सचे प्रमाण आढळून येते तर चहामध्ये फायबर्सचे प्रमाण आढळून येत नाही.

फायबर हा आपल्या शरीराच्या पचनसंस्थेसाठी आवश्यक असलेला घटक आहे. एक कप कॉफीमध्ये साधारणपणे १.१ ते १.८ ग्रॅम फायबर्सचे प्रमाण आढळून येते. या अभ्यासानुसार चहाच्या तुलनेत कॉफी जास्त फायदेशीर आहे. परंतु, केवळ एका अभ्यासाच्या आधारे आपण कॉफी आणि चहामध्ये केवळ कॉफीच फायदेशीर आहे, असे म्हणू शकत नाही.

कॅफिनबद्दल बोलायचे झाल्यास चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण चांगले असते. एक कप कॉफीमध्ये सुमारे १०० मिलीग्रॅम कॅफिन असते, तर एक कप चहामध्ये सुमारे ५० मिलिग्रॅम कॅफिन असते. मानसिक आरोग्यासाठी कॅफिन फायदेशीर मानले जाते. मात्र, कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक देखील आहे. मायोक्लिनीकच्या अहवालानुसार, दररोज ४०० मिलिग्रॅम पर्यंत कॅफिनचे सेवन हे सुरक्षित मानले जाऊ शकते. तथापि, दररोज १ किंवा २ कप कॉफी किंवा चहा पिण्यात आरोग्याचे काहीही नुकसान होत नाही.

या उलट काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, चहा आणि कॉफी दोन्ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाऊ शकते. या दोन्हींचे सेवन केल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो. आता हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बोलायचे झाल्यास, चहा आणि कॉफी दोन्ही फायदेशीर आहे. कॉफी प्यायल्याने मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

चहाबद्दल बोलायचे झाल्यास, चहा पिणे हे रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे. आरोग्याच्या दृष्टीने चहा आणि कॉफी दोन्ही ही फायदेशीर आहेत. एकंदरीत कॉफीचे अनेक फायदे अभ्यासातून समोर आले आहेत. परंतु, चहाचे फायदे कमी आहेत आणि त्याचे अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Crime: भाजप नेत्याने महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन बनवला अश्लील व्हिडिओ ; गुन्हा दाखल, पक्षात मोठी फूट

Koyna Dam Water: कोयनेतील ‘महाजनको’चा कोटा संपुष्टात; वीजनिर्मितीवर परिणाम, राज्यात भारनियमनाचे संकट, सातारा-सांगलीसमोर पाणीटंचाईचे संकट

Monsoon Delay India : मान्सून श्रीलंकेतच रेंगाळला, केरळमध्ये 'या' दिवशी धडकणार; महाराष्ट्रातही आगमन लांबणीवर? IMD चा नवा अंदाज समोर

Maharashtra Cabinet Delhi visit: दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाची धडक; साखर, कांदा आणि जलजीवन मिशनवर निर्णायक बैठक, शेतकरी आणि पाणी प्रश्नांवर मंथन

Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बनवा थंडावा देणारे बडीशेपचे सरबत! लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT