MonkeyPox Vs. Corona Sakal
आरोग्य

Coronavirus Vs Monkeypox : सारखे की वेगळे? लक्षणं काय? जाणून घ्या...

जगभरात त्याचे १६ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर भारतातही या विषाणूचे चार रुग्ण सापडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केलं. हा आजार ७० देशांमध्ये पसरला असून जगभरात त्याचे १६ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर पाच जणांचा मृत्यूही झाला आहे. भारतातही हा विषाणू आढळला असून याचे चार रुग्ण सापडले आहेत. या निमित्ताने कोरोना आणि मंकीपॉक्समधले काही ठळक फरक जाणून घ्या...

मंकीपॉक्स आणि कोरोना: दोन्ही विषाणूंचं स्वरुप काय?

मंकीपॉक्स आणि कोरोना हे दोन्ही अगदी वेगळे विषाणू आहेत. कोरोना विषाणू SARS-CoV2 यामुळे होतो. तर मंकीपॉक्स ऑर्थोपॉक्सो व्हायरस या पॉक्सविरिडी या प्रजातीतला आहे. ज्यामुळे कांजिण्याही होतात.

मंकीपॉक्स आणि कोरोना: दोन्हीची लक्षणं वेगळी असतात का?

मंकीपॉक्स आणि कोरोना या दोन्हीची लक्षणं काही अंशी सारखीच आहेत. मात्र त्यांची तीव्रता वेगवेगळी आहे.

कोरोनाची लक्षणं - ताप, थंडी, कफ, श्वास लागणे किंवा श्वास घेण्यात त्रास, थकवा, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, चव वास न लागणे, घसा खवखवणे, मळमळ, उलटी आणि जुलाब.

मंकीपॉक्सची लक्षणं - ताप, अंगदुखी, थंडी, थकवा, पुळ्या येणं, त्या दीर्घकाळ राहणं, अंगाची जळजळ

मंकीपॉक्स आणि कोरोना: दोन्ही विषाणू पसरतात कसे?

कोरोना - अगदी जवळून संपर्क आल्यानंतर बाधित व्यक्तीच्या नाकातून अथवा तोंडातून येणाऱ्या द्रावावाटे हा विषाणू पसरतो. शिंकल्याने, खोकल्याने, बोलल्याने किंवा श्वास घेण्यानेही हा विषाणू पसरतो.

मंकीपॉक्स - हा विषाणू थेट स्पर्शातून पसरतो. त्याशिवाय बाधित व्यक्तीचे कपडे वापरल्यानेही पसरतो. आत्तापर्यंत तरी हा विषाणू लैंगिक संबंधांतून पसरत असल्याचं मानलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT