Itchy genitals : प्रायव्हेट पार्टला खाज सुटणे ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही त्रासदायक ठरते, हिवाळ्यात कमी आंघोळ केल्यामुळे ही समस्या उद्भवते, तर उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि घट्ट अंतर्वस्त्रे घातल्याने ही समस्या उद्भवते. अनेकांना न आवरता येणारी खाजही यावेळी सुटू शकते.
यावेळी अनेकांना प्रायव्हेट पार्ट्समध्ये खाज आल्याने लाजीरवाणे वाटू लागते. वारंवार खाज सुटल्याने त्वचेवर लाल पुरळ उठतात. चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही नकोशी वाटणारी खाज दूर करू शकता.
1) टी ट्री ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची खाजेने होणारी चिडचिड आणि खाज कमी करणे सोपे होते. तुम्ही या तेलाचे काही थेंब प्रायव्हेट पार्टमध्ये लावा आणि काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा.
2) कडुलिंबाचे औषधी गुणधर्म सर्वांनाच माहीत आहेत, त्यात असलेले अँटीफंगल गुणधर्म संसर्ग आणि खाज सुटण्यावर रामबाण उपाय ठरतात. एका बादलीभर पाण्यात काही कडुलिंबाची पाने मिसळा आणि तासभर राहू द्या आणि त्यानंतर आंघोळ करा. हवे असल्यास पाण्यात कडुलिंबाची पाने उकळा आणि पाणी थंड झाल्यावर त्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. त्याने तुम्हाला आराम जाणवेल.
3) रोजमेरीच्या पानांमध्ये अप्रतिम सुगंध असतो, त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. तुम्ही ही पाने आधी पाण्यात उकळून घ्या आणि थंड झाल्यावर त्याने प्रायव्हेट पार्ट धुवा, खाज दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी ठरेल.
4) अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी फंगल गुणधर्म आढळतात. जर तुम्ही एका ग्लास पाण्यात 2 चमचे अॅप्पल सायडर मिसळून त्याच्या मदतीने तुमचे प्रायव्हेट पार्ट रोज स्वच्छ केलेत, तर खाज आणि पुरळ याच्या खुणा नाहीशा होतात.
5) खोबरेल तेल हा प्रायव्हेट पार्टच्या खाजेवर खात्रीशीर उपाय आहे, जेव्हा तुम्हाला ही समस्या येत असेल तेव्हा हे नॅचरल ऑईल थोडे गरम करून खाज आलेल्या भागावर लावा आणि हलका मसाज करा. तुम्हाला इफेक्ट दिसून येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.