Exercise
Exercise Sakal
आरोग्य

मानससूत्र : आरोग्यसंपन्नेतून उत्तम व्यक्तिमत्त्वाकडे

सकाळ वृत्तसेवा

व्यायाम आणि आहार यांचा शारीरिक; तसेच मानसिक संतुलनाशी अतिशय निकटचा संबध आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात सकाळी उठल्यापासून अनेक अडचणींना तोंड देत असतो.

- डाॅ. जयश्री फडणवीस

व्यायाम आणि आहार यांचा शारीरिक; तसेच मानसिक संतुलनाशी अतिशय निकटचा संबध आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात सकाळी उठल्यापासून अनेक अडचणींना तोंड देत असतो. कधी वीज नाही, तर कधी पाणी. बाहेर पडावं, तर ट्रॅफिक जॅम. कोठेही जायचे असल्यास वेळेवर पोचू की नाही ही चिंता. त्यापाठोपाठ असते ते आपले करिअर, आपली ध्येये आणि उद्दिष्टे. दिवस कसा आणि कधी संपतो ते कळतही नाही. यातून निर्माण होते चिंता Anxiety चिंता आणि नैराश्य (Depression). सुरू होतो औषधांचा मारा. अनेक अभ्यासक म्हणतात, की रोज ४५ मिनिटे धावणे, चालणे अथवा एखादा व्यायाम केल्यास नैराश्य-चिंता ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होते. मनाला प्रसन्न वाटू लागते. इतका सुंदर परिणाम अवघ्या ४५ मिनिटांत कसा काय मिळतो ते बघुया.

1) उल्हसित मनःस्थिती आणि आत्मसन्मान : जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम करतो, तेव्हा शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींमध्ये विविध प्रकारची हार्मोन्स तयार होत असतात. अत्यंत सूक्ष्म प्रमाणात भरपूर काम करत, रक्ताद्वारे सर्व शरीरभर पसरतात. व्यायामाने रक्ताभिसरण झपाट्याने होऊ लागते. शरीर Endorphin नावाने हार्मोन निर्माण करते- ज्याने आपले शरीर रिलॅक्स होऊन आनंदाची अनुभूती होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे Cartisol नावाचे हार्मोन जे ताण-तणाव निर्माण करतात- त्याचा शरीरावरील परिणाम Endorphin त्वरित कमी करू लागतात. मेंदू Dopamine; तसेच serotonin नावाची रसायने तयार करतो- ज्याने अतिशय आनंदी; तसेच उत्साही वाटू लागते. असा सुंदर परिणाम जेव्हा शरीराला मिळू लागतो, तेव्हा आयुष्यातील औषधांचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते.

2) नियमित व्यायामाने इतरही फायदे मिळतात. आनंदी संप्रेरकांमुळे आपल्या वैचारिक पद्धतीत विधायक बदल होऊ लागतात. स्मरणशक्तीचा वापर अधिक जाणीवपूर्वक केला जातो. याचा फायदा शैक्षणिक; तसेच व्यावसायिक प्रगतीत दिसू लागतो.

3) समाजातील वावर (socializing) : एखाद्या व्यायामशाळेत जातो, तेव्हा विविध वयाच्या लोकांमध्ये मिळून-मिसळून वागण्याची संधी मिळते. आपल्यासारख्या आवडी-निवडी, छंद असणाऱ्यांचा छानसा गट तयार होतो. ज्यातून एकाकीपणा; तसेच मोबाईलवर तासन्‌तास घालवणे यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो.

4) चांगल्या सवयी : एकदा का व्यायामाची आवड लागली, की इतरही चांगल्या सवयी लागतात. जसे की, पोषक आहार घेणे, पहाटे उठणे. त्यामुळे लवकर व गाढ झोप रात्री लागते. जीवनातील अनेक गोष्टींतील संयम आणि संतुलन वाढीस लागते.

5) सर्वांगीण विकास : पंचेंद्रियांचे उत्तम जतन, चांगले आरोग्य, प्रतिकारशक्तीमध्ये वाढ, स्नायू मजबूत होऊन हाडांची घनता उत्तम राहते. पुढे जाऊन सांधेदुखी, गुडघेदुखी; तसेच Osteoporosis चा धोका टाळता येतो.

6) जुनाट आजार (Cronic disease) : नियमित व्यायामाने जुनाट आजार बळावण्याचा धोका टाळता येतो. जसे की, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक.

कोणत्याही व्यायाम प्रकाराचा अतिरेक टाळावा. तीस ते साठ मिनिटांपर्यंत उत्तम. कोणतेही सांघिक खेळ हे शारीरिक तथा मानसिक आरोग्यासाठी उत्तम. त्यातिल एक ‘एरोबिक्स.’ ‘एरोबिक्स’ म्हणजे ‘with oxygen.’ या श्वसनाद्वारे घेतलेला ऑक्सिजन स्नायूंना उत्तेजित करतो. ज्यामुळे शरीराचा मेटाबोलिक रेट वाढतो. इतके सगळे फायदे असले, तरीही दुर्दैवाने आजही जगातील एक चतुर्थांश तरुण व्यायाम करीत नाहीत. तुम्हाला आजवर कोणी अस भेटलाय का ज्याला व्यायाम केल्यावर दु:ख झाले? नाही ना? अनेक मानसशास्त्रज्ञ अनेक खेळ; तसेच व्यायाम प्रकार थेरपी म्हणून यशस्वीपणे वापरतात.

पुरेशी झोप, भरपूर व्यायाम, सकस आहार, उनम नातेसंबंध, मैत्री आणि सर्वांत महत्त्वाचे मानसिक आरोग्य या सर्व माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, चैन नव्हे! चला तर मग, ‘Get going! stay active stay fit!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT