Health Care esakal
आरोग्य

Health Care : सांधेदुखीने त्रस्त आहात? मग खाण्यातून आजच वगळा हे 3 पदार्थ, नाहीतर...

आपण काही पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करतो तेव्हा प्यूरिन शरीरात पोहोचतं आणि यूरिक अॅसिड वाढते

साक्षी राऊत

Knee Pain : सांधेदुखी कायम राहात असेल राहात असेल तर तुमच्या शरीरात युरिक अॅसिडचा स्तर वाढला आहे. युरिक अॅसिड वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. युरिक अॅसिड एक प्रकारचे केमिकल असते, जे प्यरिनचं प्रमाण अधिक झाल्यास वाढतं. अनेक पदार्थांमध्ये ते आढळून येते. जेव्हा आपण काही पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करतो तेव्हा प्यूरिन शरीरात पोहोचतं आणि यूरिक अॅसिड वाढते.

शरीरात यूरिक अॅसिड वाढल्यास हे पदार्थ खाऊ नका

शुगर ड्रिंक

अनेकांना शुगर ड्रिंक किंवा ज्यूसेस पिणे आवडते. मात्र ते आरोग्यासाठी हानिकारक ठरते. मात्र त्यामुळे शरीराला फायदेशीर पोषक द्रव्ये मिळत नाहीत. युरिक अॅसिड आणखी वाढते. त्यामुळे सांधेदुखीची समस्या असल्यास एनर्जी ड्रिंक्स, गोड कॉफी, स्पोर्ट्स ड्रिंक्स, सोडा आणि इतर गोड पेय पिऊ नका.

अल्कोहोलचे सेवन करू नका

जर तुम्हाला दारू किंवा बिअर पिण्याची सवय असेल तर या दोन्ही गोष्टी आजच सोडा. हे दोन्ही हाय प्युरीन पेये आहेत, जे पिण्याने शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी लगेच वाढते आणि सांधेदुखी वाढते. त्यामुळे असे पेय शक्यतो टाळा, नाहीतर हॉस्पिटलमध्ये पोहोचायला वेळ लागणार नाही.

प्रोसेस्ड फूड टाळा

प्रोसेस्ड फूड जसे कारखान्यात बनवलेल्या चिप्स, व्हाईट ब्रेड, मफिन्स, फास्ट फूड, टॉफी, आइस्क्रीम, कुकीज आणि फ्रोझन पदार्थांमध्ये प्युरीन मोठ्या प्रमाणात आढळते. त्यांच्या सेवनामुळे शरीरात यूरिक अॅसिड झपाट्याने वाढू लागते. म्हणूनच डॉक्टर त्यांच्या रुग्णांना असे पदार्थ खाण्यास मनाई करतात. (Bone Health)

किडनी फेल होण्याचा धोका

आरोग्य तज्ञांच्या मते, सामान्यतः प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात काही ना काही प्रमाणात युरिक अॅसिड तयार होते, जे किडनीद्वारे फिल्टर केले जाते. जर यूरिक अॅसिड जास्त प्रमाणात तयार होऊ लागले, तर मूत्रपिंड देखील निकामी होते. त्यामुळे सांधे आणि गुडघ्यांमध्ये यूरिक अॅसिड गोठण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीराच्या त्या भागात वेदना सुरू होतात. जेव्हा ही समस्या वाढते, तेव्हा डॉक्टर त्यांच्या रुग्णांना व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाण्यास सांगतात.

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT