Health Care esakal
आरोग्य

Health Care : तरुणांमध्ये गुडघेदुखीचे वाढले प्रमाण; बैठी जीवनशैली, चुकीचा आहार कारणीभूत

Health Care : गुडघेदुखीचा आजार पूर्वी केवळ ज्येष्ठांमध्ये दिसत होता; पण आता तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Health Care : गुडघे कमकुवत होणे आणि गुडघेदुखीचा आजार पूर्वी केवळ ज्येष्ठांमध्ये दिसत होता; पण आता तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत आहे. १० ते १२ टक्के तरुणांमध्ये गुडघेदुखीचा आजार असल्याचे दिसून येते. यासाठी बैठे काम, चुकीचा आहार, योग्य व्यायामाचा अभाव आणि बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचे मत मुंबई येथील प्रसिद्ध अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. अभय नार्वेकर यांनी आज (ता. २) व्यक्त केले.

विदर्भ ऑर्थोपेडिक सोसायटीच्या २०२४-२५ साठीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. नार्वेकर बोलत होते. डॉ. सुधीर बाभुळकर प्रमुख पाहुणे होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. सत्यजित जगताप, सचिव डॉ. समीर द्विधमुठे यांच्यासह डॉ. योगेश देशमुख, डॉ. अमित नेमाडे, डॉ. पंकज तत्थे, डॉ. अनिरुद्ध सोनेगावकर, डॉ. ओम वाके, डॉ. नीलय हांडे, डॉ. अभिनव जोगानी, डॉ. अंकुश मोहबीय, डॉ. स्वप्निल गाडगे, डॉ. नकूल चांडक, डॉ. ह्रषिकेश राऊत, डॉ. विवेक कावलकर, डॉ. प्रणय महल्ले, डॉ अप्रतीम दीक्षित, डॉ. जय राठोड, डॉ. मिलिंद देशकर, डॉ. अविनाश येलणे, डॉ. ह्रषिकेश निकम, डॉ. विपीन राऊत, डॉ. नरेश बिडकर, डॉ. रवींद्र भजानी, डॉ. अनुप कोठारी, डॉ. आशिष पोंगाडे, डॉ. पराग राऊत, डॉ. अमोल पाटील या अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांनी पदग्रहण केले.

ही आहेत कारणे

  • स्नायू कमकुवत होणे

  • ब्लड प्रेशर अचानक

  • कमी होणे

  • ब्लड शुगरची पातळी कमी, जास्त होणे

  • थॉयराईड ग्रंथीच्या समस्या

  • गुडघ्यात संसर्ग होणे

  • ऑस्टियोआर्थराइटिस

  • मणक्यावर परिणाम करणारा संधिवात

  • पाठीच्या कण्याला दुखापत

  • वजन वाढून गुडघ्यावर भार येणे

आजार किंवा अपघातामुळे गुडघे कमकुवत होतात. लिगामेंट डॅमेजसुद्धा गुडघे कमकुवत होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. गुडघे कमकुवत होण्यामागे लिगामेंटला धक्का बसणे महत्त्वाचे कारण आहे. गुडघे एकत्र सांधून ठेवणाऱ्या लिगामेंट अर्थात अस्थिबंधांपैकी एखादं लिगामेंट डॅमेज झालं तर गुडघे कमकुवत होतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात म्हणजेच या आजाराची लक्षणं दिसताच तातडीनं वैद्यकीय उपचार घेणे लाभदायी ठरते.

-डॉ. अभय नार्वेकर, अस्थिव्यंगोपचार, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT