Banana sakal
आरोग्य

Banana Benefits: मनाला येईल तेव्हा केळी खाल तर गंभीर परिणाम भोगावे लागतील!

केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? कधीही केळी खाल्ल्याने शरीराला अपाय तर नाही होत ना…

वैष्णवी कारंजकर

 केळी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. तसंच केळी हे फळ चविष्टही असतं, त्यामुळे अनेकजण केळी अगदी आवडीने खातात. पण केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? कधीही केळी खाल्ल्याने शरीराला अपाय तर नाही होत ना...या सगळ्या विषयी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

नाश्त्याच्या वेळी केळी खाणं फायदेशीर ठरू शकत. पण फक्त केळीच खाऊ नये. त्यासोबत आणखी काहीतरी खावं. अनेकजणांना नाश्ता म्हणून फक्त केळी खाणं आवडतं. पण असं करता कामा नये. केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट आणि नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे फक्त केळी खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. त्यामुळे नाश्त्यामध्ये फक्त केळी खाऊ नये.

नाश्त्यामध्ये जर तुम्हाला केळी खाण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता. स्मूदीच्या स्वरुपात तुम्ही केळी खाऊ शकता. ओटमीलच्या वर तुम्ही केळीचे काप टाकूनही खाऊ शकता. त्याचबरोबर केळीला तुम्ही हाय प्रोटिन पदार्थांच्या सोबतही खाऊ शकता.

केळी फायबर आणि व्हिटमिन्सचा स्रोत आहे. एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये जवळपास ३ ग्रॅम फायबर असतं. केळी हाय कार्ब नाश्त्यापेक्षा जास्त चांगली असतात. पण केळ्यामध्ये नैसर्गिक स्वरुपातली साखर खूप मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे ते कधी उपाशीपोटी खाऊ नये.  

केळीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम, फायबर आणि व्हिटमिन बी६ आणि सी सारखे पोषक तत्व असतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नाश्त्याच्या वेळी हे खाल्ल्याने उर्जा मिळते. तसंच ब्लड शुगर, भूकवाढीसाठीही फायदा होतो.

केळी हा नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. पण जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे टाईप २ डायबेटिस असलेल्या लोकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT