Vitamin C google
आरोग्य

Vitamin C : 'क' जीवनसत्त्वाबद्दल या गोष्टी आत्ताच माहीत करून घ्या

मधुमेह व उच्चरक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या व्‍यक्‍तींना अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सीची आवश्यकता असू शकते.

नमिता धुरी

मुंबई : आपल्‍या शरीराचे कार्य सुव्‍यवस्थित होण्‍यासाठी योग्‍य प्रमाणात व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स मिळणे महत्त्वाचे आहे. ते रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी आणि हाडे मजबूत करण्‍यासाठी सामान्‍य वाढ व विकासाला साहाय्य करण्‍यामध्‍ये महत्त्वाचे आहेत.

विशेषत: व्हिटॅमिन सी हे पौष्टिक घटक आजारांमधून लवकर बरे होण्‍यासाठी, तसेच दीर्घकाळापर्यंत आरोग्‍य उत्तम राहण्‍यासाठी आवश्‍यक आहे. (know these things about vitamin C side effects of vitamin C deficiency ) हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

व्हिटॅमिन सी का महत्त्वाचे आहे ?

व्हिटॅमिन सी चे दिसण्‍यात आलेले फायदे अविरत आहेत. प्रबळ अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि रोगप्रतिकारशक्‍ती सिस्‍टमला साह्य करते.

मुंबईतील म्‍हापणकर्स ईएनटी क्लिनिकचे डॉ. तुषार म्‍हापणकर म्‍हणाले, ‘‘व्हिटॅमिन सी हा अनेक आरोग्यदायी फायदे देणारे आवश्यक पौष्टिक घटक आहे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती व वाढीमध्ये योगदान देण्‍यासोबत ते सर्दी, फ्लू व न्यूमोनियाचा कालावधी आणि लक्षणे कमी करून हंगामी संक्रमण कमी करण्यास देखील मदत करते.

मधुमेह व उच्चरक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या व्‍यक्‍तींना अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सीची आवश्यकता असू शकते. ते व्‍यक्‍तींचे एकूण आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याला साह्य करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते.’’

संशोधनांमधून निदर्शनास येते की, व्हिटॅमिन सी सप्‍लीमेंशन सामान्‍य सर्दीला कमी तीव्र व कमी कालावधीसाठी ठेवण्‍यास गुणकारी आहे. तसेच न्‍यूमोनिया रूग्‍णांचा हॉस्पिटलमधील स्‍टेचा कालावधी कमी झाल्‍याचे देखील निदर्शनास आले आहे.

क्लिनिकल संशोधनांनुसार, व्हिटॅमिन सी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार डोसमध्ये घेतल्यास विविध विद्यमान आरोग्य स्थितींमध्ये तुम्हाला मदत करू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला मधुमेह असल्यास व्हिटॅमिन सी तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत करू शकते.

संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, व्हिटॅमिन सी कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. तसेच, ते तुमच्या शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करू शकते, जे अॅनेमिया (शरीरात लोह पातळीची कमतरता) असलेल्या व्‍यक्‍तींना मदत करण्यासाठी महत्वाचे आहे.

याशिवाय, हे व्हिटॅमिन जखमा बरे करण्यासाठी आणि दात व हिरड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करण्यासाठी ओळखले जाते.

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचे जोखीम घटक

भारतातील बर्‍याच व्‍यक्‍तींमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता आहे. यामध्ये उत्तर भारतातील जवळपास ७४ टक्‍के वृद्ध व्‍यक्‍ती (६० वर्षे व त्यावरील) आणि दक्षिण भारतातील ४६ टक्‍के व्‍यक्‍तींचा समावेश आहे.

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेसाठी सर्वात जास्त जोखीम निर्माण करणारे घटक पुढीलप्रमाणे :

• वाढते वय

• कुपोषण

• प्रदूषण किंवा धूर, बायोमास इंधनांशी एक्‍स्‍पोजर

• धूम्रपान

• विविध संसर्गजन्‍य व असंसर्गजन्‍य आजार (एनसीडी)

तुम्हाला व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचा अनुभव येऊ शकतो अशी काही लक्षणे असू शकतात, ज्यामध्ये स्नायूदुखी व सांधेदुखी, अशक्तपणा, जखमा हळूहळू बरे होणे आणि हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव यांचा समावेश असू शकतो. ही लक्षणे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची लक्षणे आहेत का हे पाहण्यासाठी डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करा.

व्हिटॅमिन सी सेवन कशाप्रकारे वाढवू शकता ?

व्हिटॅमिन सी संपन्‍न अन्नासह संतुलित आहार शरीरातील पौष्टिक पातळी वाढवण्यास मदत करू शकतो. व्हिटॅमिनचे चांगले स्रोत असलेले काही पदार्थ आहेत: संत्री, आवळा, पेरू, स्ट्रॉबेरी, किवी, ब्रोकोली, टोमॅटो, फ्लॉवर आणि लाल मिरची यांसारख्या भाज्या.

या भाज्यांना उच्च तापमानात शिजवणे टाळावे कारण यामुळे त्यांच्यातील व्हिटॅमिन सी चे प्रमाण कमी होऊ शकते.

चांगल्या पोषणासाठी आरोग्यदायी आहार महत्त्वाचा असला तरी कमतरतेचा सामना करण्यासाठी हे पुरेसे असू शकत नाही. तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसमध्ये व्हिटॅमिन सी सप्‍लीमेंशन व्हिटॅमिन सीची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असणारी चालना देण्यास उपयुक्त ठरू शकते.

व्हिटॅमिन सी सप्‍लीमेंशन आहार घेण्यासंदर्भात मार्गदर्शन

भारतीयांसाठी व्हिटॅमिन सी ची शिफारस केलेली आहारातील मात्रा भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणानुसार प्रौढ पुरुषांसाठी प्रतिदिन ८० मिलीग्रॅम आणि प्रौढ महिलांसाठी प्रतिदिन ६५ मिलीग्रॅम प्रतिदिन आहे. गर्भवती आणि स्तनपान करणार्‍या महिलांसाठी प्रमाण वेगळे आहे).

सूचना - या लेखातील माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या औषधोपचारांसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT