थोडक्यात:
चिंचप्रमाणे आंबट चव असलेले कोकम उष्णतेवर शीतल प्रभाव टाकते आणि उलटी-जुलाबावर उपयोगी आहे.
कोकमाचे विविध खाद्यपदार्थांमधून नैसर्गिक पोषणमूल्य सहज मिळते.
स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक थकव्यावर कोकम एक प्रभावी नैसर्गिक कूलिंग एजंट म्हणून काम करते.
How kokum helps women during hormonal changes: आंबट हा शब्द म्हटला, की आठवते ती चिंच आणि मग त्यापाठोपाठ कोकम! चिंच थोडी मारक व उष्ण; परंतु कोकम थंड व उलटी-जुलाबासाठी चालणारे. आमसूल कोकम फळाच्या सालीपासूनच तयार करतात. स्वयंपाकघरात पदार्थ बनताना अनेक ठिकाणी कोकम वापरण्याची गृहिणींची सहज प्रवृत्ती असते.
कोकम चटणी, कोकम सार, कोकमाची आमटी, सोलकढी असे अनेक पदार्थ खाताना आपल्या नकळत त्याचे पोषणमूल्य आपल्यापर्यंत पोचत असते. हेच आमसूल/कोकम आपण आरोग्याकरिता वापरू लागतो, तेव्हा लक्षात येते, की स्त्रियांसाठी हे एक कूलिंग एजंट आहे. स्त्रीच्या मनाला व शरीराला थंड आणि शांत ठेवण्यासाठी याचा खूप छान वापर करता येऊ शकतो.
ब आणि क जीवनसत्त्व, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज, ॲसेटिक आम्ल, गार्सिनॉल, पॉलिफेनॉल, बियांपासून तेल इत्यादी.
- आम्लपित्त : अवेळी खाणे, जंकफूडचे सेवन, उपवासाच्या पदार्थांचे अतिसेवन, गर्भारपण, ओषधांचे दुष्परिणाम इत्यादी गोष्टींनी आम्लपित्ताचा त्रास स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो. अशा वेळी घशात, छातीत जळजळ होते, पोटात आग होते. कोकमचे ताजे सरबत करून- जिरेपूड घालून प्यावे. उपवासाच्या पदार्थांना कोकम चटणी वा सोलकढीची जोड द्यावी. नुसते कोकमही मीठ लावून चघळून खाता येईल.
- मूत्रदाह : नोकरीनिमित्ताने घराबाहेर असणाऱ्या स्त्रिया, उन्हात सतत काम करणाऱ्या स्त्रिया, वारंवार प्रवासाला जाणाऱ्या स्त्रिया ह्यांच्यामध्ये व डायपरचा वापर करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास आठवून येतो. अनेकदा लघवीचा जंतुसंसर्गही कारणीभूत असतो. ही आग कमी होण्यासाठी कोकमचे सरबत पीत राहावे.
- संप्रेरकांचे असंतुलन : पाळी जाण्याच्या वयात स्त्रियांमध्ये हार्मोनल इंबॅलन्स होणे नैसर्गिक असते. मात्र, या कालावधीत अनेक स्त्रियांना उष्णतेचा त्रास होतो व त्याची लक्षणेही अनेकदा तीव्र स्वरूपाची असतात. प्रचंड घाम येणे, अंगाचा दाह होणे, हात-पाय-डोळ्यांची जळजळ होणे, पोटात गरम वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही तीव्रता कमी करण्याकरिता कोकम उत्तम पर्याय आहे. रोज जेवणात कोकम असावे. दुपारी कोकमचे पाणी प्यावे. छोटे तुकडे डब्यात न्यावे व दिवसभरात चघळून चघळून सुपारीप्रमाणे खात राहावे.
कोकम कोणकोणत्या शारीरिक तक्रारींवर उपयुक्त ठरते?
(What health issues can kokum help with?)
➤ कोकम आम्लपित्त, मूत्रदाह, उष्णतेचा त्रास आणि हार्मोनल असंतुलन यावर नैसर्गिक आराम देते.
कोकम कोणत्या स्वरूपात सेवन करणे फायदेशीर ठरते?
(In what forms can kokum be consumed for health benefits?)
➤ कोकम सरबत, कोकम चटणी, सोलकढी, कोकमाचे पाणी किंवा मीठ लावून कोकमाचे तुकडे चघळून खाणे हे सर्व फायदेशीर आहेत.
स्त्रियांसाठी कोकम का उपयुक्त आहे?
(Why is kokum especially beneficial for women?)
➤ हार्मोनल बदल, उष्णता आणि पचनातील तक्रारींवर कोकम शीतलता आणि आराम देते, म्हणून ते स्त्रियांना विशेष उपयुक्त आहे.
उन्हाळ्यात कोकमचे सेवन का आवश्यक आहे?
(Why is kokum important during summer?)
➤ कोकम नैसर्गिक थंडावा देते, घाम, दाह, डिहायड्रेशन आणि उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून बचाव करते.