Low BP esakal
आरोग्य

Low BP : बीपी लो झाल्यास या गोष्टींचे सेवन करा, बीपी नॉर्मल होण्यास मदत होईल

अशावेळी काय घरगुती उपाय कराल हे समजून घेणे गरजेचे आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

Low BP : डोळ्यासमोर अंधारी येणे, अचानक भोवळ येणे यासारख्या समस्या जाणवत असे. अचानक लो बीपी झाल्यावर पाच घरगुती उपाय ठरतील फायदेशीर. अशावेळी काय घरगुती उपाय कराल हे समजून घेणे गरजेचे आहे.

बीपी कमी झाल्यास काय कराल?

अचानक लो बीपी झाल्यास चक्कर येऊ शकते. तसेच थकवा यासारख्या समस्या जाणवतात.

हातापायांना मरगळ येऊन ताकद निघून जाणे यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी तात्काळ मीठ, साखर पाणी प्यावे.

बीपी लो होता इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी प्यावे. यामुळे बीपी नॉर्मल होण्याची शक्यता असते.

जर घरी इलेक्ट्रॉल पावडर नसेल तर लिंबू पाणी उपयोगी ठरते. इलेक्ट्रॉल पावडर घरी ठेवावे .

कमी रक्तदाबावर कॅफिन मदत करते. कॉफीला पाण्यात उकळून प्यावी. ज्यामुळे बीपी नॉर्मल होऊ शकते. शक्य असल्यास चहा पिऊ शकतात.

डाएटची घ्यावी काळजी

कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने आपल्या डाएटची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. या लोकांनी उपवास करणे सहसा टाळावे. फार काळ उपाशी राहू नये. लो बीपीवर उपयुक्त केळ, मखाना, पपई, मुळा, पालक यासारखे पदार्थ खावेत.

मीठ - अति मीठ शरीरासाठी घातक असले तरीही लो बीपीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने मीठाचा समावेश आहारात आवर्जून करावा. व्यायाम करताना एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी लिंबू पाणी प्यावे.

कोमट पाणी - कोमट पाण्याने देखील लो बीपीचा त्रास कमी होतो. त्यामुळे थोडा थकवा जाणवला तर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी आरोग्यासाठी देखील चांगले असते.

गरम दूध - अचानक शरीरातील रक्तदाब कमी झाला तर गरम दूध देखील याचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते. लो बीपीचा त्रास जाणवलास गरम दूध प्यावे. गरम पाणी आणि गरम दूध शरीरासाठी चांगलेच असते.

बीपी कमी होण्याची कारणे

चुकीची लाईफस्टाईल, प्रोसेस्ड फूड आणि फास्ट फूडचे अधिक सेवन

जेनेटिक हायपरटेंशन

जास्त स्मोकिंग

जास्त मद्यप्राशन करणे.

(टिप- वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी

तज्ज्ञांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT