Malaika Arora Fitness esakal
आरोग्य

Malaika Arora Fitness : मलायकाचं मॉर्निंग रूटीन आहे फारच खास, म्हणूनच वाढत्या वयातही दिसते हॉट...

तिचं मॉर्निंग रूटीन आहे फारच खास. त्यामुळेच ती फार तरुण दिसते.

सकाळ ऑनलाईन टीम

Malaika Arora Fitness Tips : बॉलीवू़ड विश्वाबाहेरसुद्धा मलायकाच्या फिटनेसची भन्नाट चर्चा चालत असते. मलायका वाढत्या वयातही एवढी तरुण दिसते कशी असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तसेच तिच्या फिटनेस टीप्स आणि तिचा हेल्दी डाएट याबाबतही गूगलवर सर्वाधिक सर्च केल्या जातं. मात्र तुम्हाला मलायकाचं मॉर्निंग रूटीन माहितीये काय? तिचं मॉर्निंग रूटीन आहे फारच खास. त्यामुळेच ती फार तरुण दिसते.

चला तर आज आपण मलायकाच्या मॉर्निंग टीप्सबाबत जाणून घेऊया. तुम्हीही या टीप्सने तरूण दिसू शकता. तसेच तिचं मॉर्निंग रूटीन तुम्हाला वजन कमी करण्यासही फायदेशीर ठरेल.

मलायकाने एक व्हिडीओ शेअर करत फिटनेस मंत्रा शेअर केलाय. तिने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, तुम्ही सर्वांनी दांड्याचा उपयोग करून योगाभ्यास करावा आणि त्याचा रोज सराव करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे दांडा उपलब्ध नसेल तर तुम्ही बदली म्हणून योगा बेल्ट वापरू शकता.

माझ्या योगा प्रॅक्टीसमध्ये मी बरेचदा याचा वापर करते. हे योग्य आसन संरेखन करण्यात मदत करते, मुद्रा सुधारते आणि शरीराचे संतुलन सुधारते. तेव्हा तुम्हीही या योगाभ्यास फॉलो करू शकता.

मलायका ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसेच तिच्या फिटनेससाठी ती फार चर्चेत असते. तिच्या वेगवेगळ्या स्लीम ड्रेसमधील फोटोजने ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. फिटनेस टीप्ससाठी सर्वाधिक सर्च करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

मलायका जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेली तरी तिचा योगा काही सुटत नसतो. मागे तिने मालदीवहून एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना योगा टीप्स दिल्या होत्या. ती खालील योगासनाबाबत बोलत होती. (Exercise)

उत्कटासन(The Chair Pose) - तुमचे शरीर टोन करण्यास हे आसन मदत करते, त्यामुळे तुमच्या शरीराचे संतुलन सुधारते. तसेच हे आसन क्वाड्रिसेप आणि ग्लूटल स्नायूंना लक्ष्य करते. ही पोझ करत असताना काही सेकंद तसेच राहा. शरीराची ताकद वाढल्यावर कधी थांबायचे ती वेळ ठरवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT