Yoga Omkar Importance Sakal
आरोग्य

योग जीवन : ॐकाराचे महत्त्व

आपण आजपर्यंत विविध प्रकारची योगासने कशी करावीत त्‍याबद्दलची माहिती बघितली, मात्र आज आपण ॐकार दररोज म्हटल्यामुळे काय लाभ होतो हे जाणून घेऊ.

मनाली देव

आपण आजपर्यंत विविध प्रकारची योगासने कशी करावीत त्‍याबद्दलची माहिती बघितली, मात्र आज आपण ॐकार दररोज म्हटल्यामुळे काय लाभ होतो हे जाणून घेऊ.

आपण आजपर्यंत विविध प्रकारची योगासने कशी करावीत त्‍याबद्दलची माहिती बघितली, मात्र आज आपण ॐकार दररोज म्हटल्यामुळे काय लाभ होतो हे जाणून घेऊ. पुढील भागापासून काही श्वसनाच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया.

मार्च महिना म्हणजे परीक्षांचे दिवस. सध्या सर्वत्र खूप अभ्यास आणि ताण-तणाव दिसून येत आहे. हेच ताण तणाव कमी करण्यासाठी ॐकार साधना दररोज करणे आवश्यक आहे. शक्‍यतो सकाळी लवकर उठून ११ किंवा २१ वेळा ॐकार म्हणावा.

मात्र, तुम्‍ही तुमच्या इच्‍छेनुसार, साधनेनुसार कितीही करू शकता. ॐकार साधनेमुळे मानसिक शांतता मिळते. सकारात्‍मक ऊर्जा निर्माण होते. ती आपल्‍या विचारांमध्ये उतरते. नकारात्‍मकता, वाईट विचार, ताणतणाव, भीती, नैराश्य हे कमी होते. शरीरातील ऊर्जा व चैतन्य वाढते. मनावरील संयम वाढतो. धारणा-ध्यान करण्यासाठीची बैठक तयार होते. आध्यात्‍मिक प्रगतीसाठी ही साधना उपयुक्त असून, त्यामुळे एकाग्रता वाढते. चिडचिड कमी होते.

यामुळे शारीरिक फायदे देखील होतात. फुफ्फुसांची ताकद वाढते, दम्‍याचा त्रास, श्वसनाचे त्रास कमी होतात. धाप लागण्याचे प्रमाण कमी होते. रक्‍तदाबाचा त्रास, थायरॉईड, हार्मोनल संतुलन, महिलांच्या काही समस्या आदी सर्व त्रास कमी होण्यास मदत होते. व्याधींनुसारची ॐकार साधना ही तज्ज्ञांकडून शिकून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : आसाममध्ये भाजपचं शतक, काँग्रेसचे २१ उमेदवार आघाडीवर

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT