Rapid breathing sakal
आरोग्य

योग जीवन : जलद श्‍वसन

जलद श्‍वसन म्हणजेच भस्त्रिका प्राणायाम, कुठल्याही ध्यानात्मक आसनस्थितीमध्ये बसावे. त्यानंतर एक नाकपुडी अंगठा किंवा तर्जनीने (पहिले बोट) बंद करावी. दुसऱ्या नाकपुडीने श्‍वास घ्यावा व सोडावा.

मनाली देव

जलद श्‍वसन म्हणजेच भस्त्रिका प्राणायाम, कुठल्याही ध्यानात्मक आसनस्थितीमध्ये बसावे. त्यानंतर एक नाकपुडी अंगठा किंवा तर्जनीने (पहिले बोट) बंद करावी. दुसऱ्या नाकपुडीने श्‍वास घ्यावा व सोडावा.

जलद श्‍वसन म्हणजेच भस्त्रिका प्राणायाम, कुठल्याही ध्यानात्मक आसनस्थितीमध्ये बसावे. त्यानंतर एक नाकपुडी अंगठा किंवा तर्जनीने (पहिले बोट) बंद करावी. दुसऱ्या नाकपुडीने श्‍वास घ्यावा व सोडावा. हा श्‍वास जलद व जोरात घेणे-सोडणे अपेक्षित आहे. श्‍वास घेताना-सोडताना श्‍वासाचा आवाज येतो. दररोज १५-२० आवर्तने करणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे दोन्ही नाकपुड्या, नासिकामार्ग हा मोकळा होतो. एक-एक नाकपुडीने करून झाले, की दोन्ही नाकपुड्यांनी एकदमही करू शकता. जलद श्‍वसनाच्या नियमित सरावाने श्‍वसनमार्ग स्वच्छ होतो.

फायदे

  • सर्दी, कफ हे त्रास कमी होतात, फुफ्फुसांची ताकद वाढून श्‍वसनाचे त्रास.

  • अस्थमा कमी होण्यास मदत होते.

  • अंगातील उष्णता थोडी वाढते. जठराग्नी प्रदीप्त होतो.

  • वात, पित्त, कफ या दोषांवर नियंत्रण होण्यास मदत होते.

  • शरीरातील अशुद्धता, नकारात्मकता (टॉक्सिन्स) बाहेर पडण्यास मदत.

  • संपूर्ण शरीरासाठी आवश्‍यक.

ही काळजी घ्या

  • भस्त्रिका प्राणायाम झाल्यानंतर दीर्घश्‍वसन करावे.

  • रक्तदाब, हृदयासंबंधित त्रास, व्हर्टिगो, चक्कर, मेंदूचे आजार, पोट-पाठीची तीव्र दुखणी असतील तर करू नये.

  • हा प्राणायाम करताना चक्कर येत असेल किंवा त्रास होत असल्यास सराव लगेच थांबवून दीर्घ श्‍वसन करा.

  • योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकून घ्या. शारीरिक व्याधी असल्यास त्रास होऊ शकतो.

लहान मुले, मोठ्या व्यक्तींनी ह्याचा अभ्यास कामाहून-बाहेरून-शाळेतून आल्यावरदेखील करावा. सध्या श्‍वसनाचे बरेच त्रास दिसून येत आहेत. त्यासाठी बाहेरून आल्यावर करणेही लाभदायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मला मतदान करू नका म्हणणारे अपक्ष गोकुळ गिते आघाडीवर; शिंदेंचा उमेदवार म्हणाला, महायुतीने घात केला, सगळे गद्दार

मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, पुढील ३ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

India-Russia: रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात; आखाती देशातील तणावामुळे भारताची नवी रणनिती

Latest Marathi News Live Update : परभणी-हिंगोलीत महायुतीचा उमेदवार विजयी, मविआच्या उमेदवाराचा पराभव

Girish Mahajan : 'वडील हयात नाहीत, तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर'; 'त्या' वादग्रस्त फोटोबाबत मंत्री महाजनांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT