Shitali Pranayam sakal
आरोग्य

योग जीवन : शीतली प्राणायाम

आपण आज शरीराला थंडावा देणारा, उन्हाळ्यात करण्याचा प्राणायाम बघणार आहोत. हा शीतली प्राणायामसुद्धा तोंडाने श्‍वास घेऊन करतात.

मनाली देव

आपण आज शरीराला थंडावा देणारा, उन्हाळ्यात करण्याचा प्राणायाम बघणार आहोत. हा शीतली प्राणायामसुद्धा तोंडाने श्‍वास घेऊन करतात.

आपण आज शरीराला थंडावा देणारा, उन्हाळ्यात करण्याचा प्राणायाम बघणार आहोत. हा शीतली प्राणायामसुद्धा तोंडाने श्‍वास घेऊन करतात. त्यामुळे स्वच्छ, हवेशीर खोलीमध्ये जिथे धूळ व उग्र वास, धूर नाही अशा ठिकाणी सराव करावा. कुठल्याही ध्यानस्थ स्थितीत, खुर्चीवर ताठ बसावे. दोन्ही हात ज्ञानमुद्रेत असावेत.

तोंड थोडेसे उघडून तोंडाचा (ओठांचा) आकार इंग्रजी ‘ओ’ प्रमाणे करावा. त्यामधून जीभ पूर्ण बाहेर काढून त्याचा आकार नळीप्रमाणे करावा. तोंडाने दीर्घ श्‍वास घ्यावा, मग जीभ आत घेऊन तोंड बंद करावे व नाकाने श्‍वास सोडावा. अशी १०-१५ आवर्तने तरी करावीत.

आसनाचे फायदे

  • आसनाच्या सरावाने उष्णतेचे त्रास, दाह कमी होतात.

  • राग, चिडचिड, त्रागा कमी होतो, उष्णतेचे विकार कमी होतात.

  • यात जिभेलासुद्धा ताण बसल्याने जिभेचे कार्य सुधारते.

  • गालाला, गळ्याला, चेहऱ्याच्या स्नायूंनाही उत्तम ताण बसतो.

  • चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारून पुरळ, मुरूम कमी होण्यास मदत होते.

  • चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही काही प्रमाणात मदत होते.

  • डोळे व त्वचेसाठीसुद्धा उपयुक्त. मानसिक ताण-तणाव कमी होण्यास उपयुक्त.

  • मानसिक शांतता मिळण्यासही मदत होते. गळ्यावरसुद्धा दाब आल्याने तेथील स्नायू व शिरा, ग्रंथी अधिक कार्यक्षम होतात.

याचा योग्य सराव झाला की बंध बांधून अभ्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

SCROLL FOR NEXT