Bad Cholesterol कमी करण्यासाठी फळ Esakal
आरोग्य

या फळाच्या सेवनाने Bad Cholesterol होईल दूर आणि वजनही होईल कमी, आरोग्यासाठी अनेक फायदे

चवीला अत्यंत एखाद्या क्रिम किंवा बटर सारखं लागणाऱ्या एवोकाडो फळाचे Fruit आरोग्यासाठी असंख्य फायदे असल्यानेच या फळाला सूपरफूड Superfood म्हंटलं जाऊ लागलं आहे

Kirti Wadkar

एवोकाडो हे फळ मुळचं भारतीय फळ नसलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हे फळ अनेक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होवू लागलं आहे. खास करून एवोकाडो Avocado हे फळं एक सूपरफूड असल्याची चर्चा वाढल्यापासून या फळाची मागणी आणि लोकप्रियता अधिक वाढू लागली आहे. Marathi Health Tips Know Avocado fruit and its benefits

एवोकाडो फळामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे अनेकजण आहारामध्ये या फळाचा समावेश करू लागले आहेत.

चवीला अत्यंत एखाद्या क्रिम किंवा बटर सारखं लागणाऱ्या एवोकाडो फळाचे Fruit आरोग्यासाठी असंख्य फायदे असल्यानेच या फळाला सूपरफूड Superfood म्हंटलं जाऊ लागलं आहे. एवोकाडोमध्ये फायबर, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी६, सी आणि ई मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

एवोकाडोमधील या पोषक तत्वांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत

एवोकाडोच्या सेवनामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल Bad Cholesterol कमी होण्यास मदत होते. यातील मोनोसॅच्युरेडेट फॅट्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. तसंच यामुळे शरीरातील प्लाज्मा ट्राइग्लिसराइड्सदेखील कमी होतात. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर

एवोकाडोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन इ तसंच व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने या फळाच्या सेवनाचे त्वचेसाठी देखील असंख्य फायदे आहेत. एवोकाडोमध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेतील पेशींचं नुकसान होण्यापासून बचाव होतो. एवोकाडोच्या सेवनामुळे त्वचा तरुण, ग्लोइंग आणि हेल्दी राहण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

वजन होईल कमी

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर तुमच्या डाएटमध्ये तुम्ही एवोकाडोचा समावेश करू शकता. या फळामध्ये उपलब्ध असलेल्या फायबर आणि पोषक तत्वामुळे तुमचं पोट जास्त काळ भरलेलं राहतं. खास करून जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये या फळाचा समावेश केलात तर तुम्हाला दुपारी उशिरापर्यंत भूक लागणार नाही.

शिवाय एवोकाडोमध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरी आणि मोठया प्रमाणात पोषक तत्व असल्याने वजन कमी करण्यासोबत पोटाची चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोका होईल कमी

एका अभ्यासानुसार एवोकाडोच्या सेवनामुळे किमोथेरपीदरम्यान होणारे साइड इफेक्टस् कमी होऊ शकतात. तसंच या फळाच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये आढळणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळे आणि दृष्टी चांगली राहण्यासाठी देखील एवोकाडोचं सेवन फायदेशीर ठरतं. अवोकाडोमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन कॅरोटीनोइड्स असतात. हीच दोन फायटोकेमिकल्स डोळ्यांच्या ऊतींमध्ये आढळतात. त्यामुळेच या फळाच्या सेवनामुळे डोळ्याचं अतिनील किरणांपासून संरक्षण होतं.

पोषकद्रव्य शोषण्यास मदत

जेवणासोबत एवोकाडो खाल्ल्याने शरीराला जास्त अँटिऑक्सिडंट्स शोषण्यास मदत होऊ शकते.

यासोबतच एनर्जी बूस्ट करण्यासाठी, ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यासाठी आणि त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यासाठी अवोकाडोचं सेवन फायदेशीर ठरतं. तुम्ही आहारामध्ये एवोकाडो सॅण्डवीच, स्मूदी किंवा सलाडसोबत खाऊ शकता.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबईत वाहतूक बदल; 'या' भागात प्रवेश बंदी, वाचा सविस्तर...

Viral Video: कुलूप उघडण्याची अनोखी पद्धत! चोराचा लाईव्ह डेमो पाहून पोलीसही अवाक्... पाहा व्हिडिओ

Pawandeep Rajan : अपघाताच्या 3 महिन्यानंतर 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप कसा आहे? म्हणाला माझा जीव....

निशांची मधील पहिले गाणे 'डिअर कंट्री' प्रदर्शित! तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी केले मनात घर

Malegaon Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३० दुचाकी चोरणाऱ्या ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT