लोंगन फ्रुटचे फायदे Esakal
आरोग्य

Litchi सारख्या ‘या’ फळाचे आहेत चमत्कारिक फायदे, आयर्नची कमतरता होईल दूर

हे फळ दिसायला लिचीसारखच Litchi दिसत असलं तरी चवीला हे लिचीहून खूप वेगळं आहेत. शिवाय या फळाचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. घ्या जाणून या फळाबद्दल.....

Kirti Wadkar

लिची सारखंच दिसणारं एक फळ म्हणजे लोंगन. खरं तर हे फळ विदेशी असलं तरी आशिया खंडातही हे फळ सहज मिळतं. भारतात देखील हे फळ पाहायला मिळतं. भारत, श्रीलंका, चीन आणि दक्षिण भारतात देखील हे उगवतं. Marathi Health Tips know Litchi alike longan fruit and its benefits

हे फळ दिसायला लिचीसारखच Litchi दिसत असलं तरी चवीला हे लिचीहून खूप वेगळं आहेत. शिवाय या फळाचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. लोंगन फळामध्ये Longan Fruit मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.

तसंच या फळामध्ये अँटीऑक्सिडंट Anti Oxidant गुणधर्म देखील आढळतात. यासोबतच या फळांमध्ये व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन सी, मग्नेशियम, सिलकॉन, फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. लोंगन फळाचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अगदी वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी राहण्यासाठी या फळाची मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत- लिचीप्रमाणेच लोंगन फ्रूटमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसंच या फळात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्मांमुळे इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते.

यातील अँटीवायरल गुणांमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका टळतो.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- लोंगन फळामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यंत कमी असून यात फॅटसचं प्रमाणही शून्य असतं. तसंच यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने सारखी भूक लागत नाही. म्हणूनच जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आहारामध्ये लोंगन फळाचा समावेश करणं उपयुक्त ठरेल.

हे देखिल वाचा-

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत- रक्तदाब नियंत्रणात राखण्यासाठी तुम्ही लोंगन फळाचं सेवन करू शकता. या फळामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम उपलब्ध असल्याने रक्तवाहिन्यांमधील स्ट्रेस लेव्हल कमी करून रक्तदाब नियंत्रणात राहण्यात मदत होते.

कॅन्सरचा धोका होतो कमी- लोंगन फळाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तर मदत होतेच शिवाय या फळामध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म आढळतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

लैंगिक समस्यांवर उपाचार- लोंगन फळाच्या सेवनामुळे सेक्ससंबधीच्या म्हणजेच विविध प्रकारच्या लैंगिक समस्या दूर होतात. चीनमध्ये लोंगन फळाचं सेवन सेक्स टॉनिक म्हणून केलं जातं. महिला तसंच पुरुषांमध्ये काम वासना वाढवण्यासाठी या फळाचा उपयोग होतो, असं सांगितलं जातं.

तसंच लोंगन फळाच्या सेवनामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. या फळाच्या सेवनामुळे तणाव कमी होतो. डोकं शांत राहून चांगली झोप येण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT