Acidity Problems in marathi Esakal
आरोग्य

Acidity Problems: गॅस आणि पोटफुगीमुळे आहात त्रस्त मग आहेत या Home Remedies

खरं तर आपल्या स्वयंपाक घरातच Kitchen अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे अनेक छोट्या मोठ्या समस्यांवर उपचार करणं सोप आहे. त्याचप्रमाणे किचनमधील काही पदार्थांच्या मदतीने गॅसची Stomach Gas समस्या दूर करणं देखील शक्य आहे

Kirti Wadkar

पोट फुगणं किंवा पोटामध्ये गॅस होणं ही तशी साधारण समस्या बनली आहे. जेवल्यानंतर किंवा अलिकडे जंक फूड खाल्ल्याने पोटामध्ये गॅस निर्माण होतो.

अनेकदा जास्त गॅस झाल्याने पोटात कळा  मारणं किंवा पोटात दुखणं Stomach Pain तसचं पोटाला आतून सूज येणं अशाही समस्या उद्भवतात.  गॅस झाल्यावर अनेक लोक वेगवेगळी औषधं Medicines घेतात. मात्र काही घरगुती उपचारांनी पोटातील गॅसची समस्या दूर कऱणं शक्य आहे. Marathi Health Tips Stomach Gas Reliever Home Remedies

खरं तर आपल्या स्वयंपाक घरातच Kitchen अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे अनेक छोट्या मोठ्या समस्यांवर उपचार करणं सोप आहे. त्याचप्रमाणे किचनमधील काही पदार्थांच्या मदतीने गॅसची Stomach Gas समस्या दूर करणं देखील शक्य आहे. 

१. बडीशेप- बडीशेपेमुळे गॅसच्या समस्येपासून सुटका होणं शक्य आहे. यातील अँटीबॅक्टेरीयल गुण पोटातील गॅसची समस्या दूर करतात. जेवण योग्यरित्या पचण्यासाठी बडीशेप उपयुक्त ठरते. जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर चावून खावी यामुळे पोटाला आराम मिळेल. 

२. ओवा- गॅस आणि पोटभुगीची समस्या दूर करण्यासाठी ओवा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. यात पचनासाठी उपयुक्त असे गुणधर्म आहेत. पोट फुगल्यास अर्धा चमचा ओवा, चिमुटभर हिंग आणि थोड्यासं काळं मीठ चावून खावं. त्यानंतर यावर कोमट पाणी प्यावं. यामुळे त्वरित आराम मिळेल.  

३. दही- दह्यामधील प्रोबायोटिक्स पचन क्रिया सुधारण्यास आणि ते सुरळीत करण्यास मदत करते. यामुळे गॅसची समस्या दूर होते. गॅसचा त्रास होवू लागल्यास दही किंवा लस्सीचं सेवन करावं. दही, लस्सी किंवा ताकाचं सेवन करताना त्यात काळं मीठ टाकायला विसरू नका. 

४. पुदीना- पोटाच्या समस्येवर पुदीना फायदेशीर ठरू शकतो. यातील डायजेस्टिव्ह गुण ही पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. पुदीनाच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते, तसचं गॅस आणि पोटदुखीच्या त्रासातून आराम मिळतो. तुम्ही पुदिना ताकामध्ये किंवा लिंबू सरबतामध्ये टाकून पिऊ शकता.

हे देखिल वाचा-

५. केळं- केळं हे फळ एनर्जी देण्यासोबतच गॅस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटासिड आढळतं ज्यामुळे अॅसिड रिफ्लक्स टाळण्यास मदत होते. गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास दूर करायचा असेल तर दररोज एका केळ्याचं सेवन करावं. 

६. जीरं- जिरं हे उत्तम अॅसिड न्यूट्लायझर म्हणून ओळखलं जातं. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होतेच शिवाय पोटदुखीपासूनही आराम मिळतो. जेवणानंतर भाजलेल्या जिऱ्याला क्रश करून एक ग्लास पाण्यामध्ये टाका. हे पाणी प्या. किंवा एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा जिरं टाकूनही तुम्ही त्याचं सेवन करू शकता.

७. दालचिनी चहा- रोजच्या गरम मसाल्यामधील दालचिनी ही स्वयंपाकातील स्वाद वाढवण्यासोबत आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी दालचिनी गुणकारी आहे. दालचिनी एक असा गरम मसाला आहे तो नैसर्गिकरित्या अँटासिडच्या रुपात कार्य करतो. अन्न पचन योग्यरित्या व्हावं यासाठी तसचं पोटाला शांत ठेवण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. 

दालचिनीमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधील इंफेक्शन दूर करणं शक्य आहे. यासाठी दालचिनीच्या चहाचं सेवन करावं. Stomach Gas Home Remedies

८. तुळस- तुळशीच्या पानांमध्ये कार्मिनेटिव्ह गुण असताता ज्यामुळे अॅसिडीटीच्या त्रासापासून लगेचच आराम मिळू शकतो. यासाठी केवळ तुळशीची ३-४ पानं स्वच्छ धुवून चखळून खावी. तुम्ही तुळशीचा चहा देखील घेऊ शकता.

यासोबतच आल्याचा चहा किंवा आलं आणि लिंबाच्या रसाचं तुम्ही सेवन करून गॅसची समस्या दूर करू शकता. गॅसच्या समस्येवर मेडिकलमधील औषधं घेण्यापूर्वी घरगुती उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT