योगासनांद्वारे बद्धकोष्ठता दूर
योगासनांद्वारे बद्धकोष्ठता दूर Esakal
आरोग्य

Yoga for Constipation: पोट साफ न होण्याच्या समस्येने आहात त्रस्त, मग या योगासनांमुळे होईल बद्धकोष्ठता दूर

Kirti Wadkar

Yoga for Constipation: नियमितपणे पोट साफ न होणं ही तशी सामान्य समस्या आहे. मात्र या समस्येमुळे तुमच्या पचनसंस्थेवर आणि तुमच्या शरीरावर Human Body विपरीत परिणाम होत असतो.

पोट साफ न होणं किंवा बद्धकोष्ठता Constipation तसचं गॅस यामुळे पोटासंबधीच्या इतर समस्या निर्माण होतात. यासाठीच नियमित पोट साफ होणं गरजेचं आहे. Marathi Health Tips to get rid from constipation problem

अनेकांना केवळ काही दिवस बद्धकोष्ठतेचा Constipation चा त्रास होतो. तर अनेकजण असेही आहेत ज्यांना कायमच पोट साफ न होण्याच्या समस्येमुळे इतर अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो.

अनेकजण पोट साफ होण्यासाठी काही औषधं Drugs तसचं अनेक घरगुती उपाय करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का नियमितपणे काही योगासनं Yoga केल्याने बद्धकोष्ठता तसचं गॅसची समस्या दूर होते.

हे देखिल वाचा-

अनेकजण घरगुती उपायांवर भर देतात मात्र योगाभ्यासाकडे दूर्लक्ष करतात. आपल्या योगशास्त्रात अशी काही योगासनं Yoga आहेत ज्यांच्यामुळं पचनसंस्था सुधारण्यास Digestive System तसचं मल आणि गॅस उत्सर्जनास मदत मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल माहिती देणार आहोत.

हलासन- अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटासंबधीच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हलासन हा एक चांगला योग प्रकार आहे. नियमित हलासन केल्याने पचनक्रिया सुधारते. तसचं वजन कमी करण्यासाठी आणि पाठीचे स्नायू मजबुत करण्यासाठी देखील हलासन उपयुक्त ठरतं.

भुजंगासन- पचनसंस्थेच्या कार्यात बिघाड झाल्याने अनेकदा पोट साफ न होण्याची समस्या उद्धवते.यासाठी भुजंगासन फायदेशीर ठरू शकतं. भुजंगासनामुळे पचनक्रिया सुधारते यामुळे पोटाचे स्नायू बळकट होण्यासही मदत होते.

भुजंगासन हे अत्यंत सोपं आसन आहे. यासाठी योगामॅटवर किंवा चटईवर पोटावर झोपा. दोन्ही हात फरशीवर समांतर ठेवा. पोटाचे स्नायू आणि दोन्ही पाय सरळ रेषेत राहतील याची काळजी घ्या. त्यानंतर दीर्घ श्वास घेत डोकं हळूहळू वर उचला.

कंबरेपासून शरीराचा पायापर्यतचा भाग जमिनीला स्पर्श करेल असा राहू द्या. तर डोकं छताच्या दिशेवर वर करण्यचा प्रयत्न करा. ३० सेकंदासाठी या आसनाच्या स्थित थांबा. साधारण ३-४ वेळा हे आसन करा.

पवनमुक्तासन- नियमितपणे हे योगासन केल्याने पचनसंस्थेचे स्नायू घट्ट होतात, आणि अन्न पुढे जाण्यास मदत होते. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. इरिटेबल बोवेल सिंड्रोमची समस्या असलेल्या व्यक्तींनी दररोज पवनमुक्तासन केल्यास नक्कीच फायदा होईल.

या आसनामुळे या गुद्द्वारातील स्नायूंचा ताण कमी होण्यासही मदत होईल. तसचं गॅस रिलीज होण्यास मदत होईल. हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपा. त्यानंतर गुडघे वाकवून छातीच्या दिशेने खेचा.

डोकं काहीसं वर उचलून आणि हातांच्या मदतीने गुडघे छातीकडे Chest हळूवार खेतच गुडघ्यांनी कपाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वासोच्छवास घेत काही वेळ या स्थितीत रहा. हे आसन ३-४ वेळा करा.

वज्रासन- बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी वज्रासन हे एक उत्तम आसन आहे. यामुळे पोटाच्या भागामध्ये रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. वज्रासनामुळे बद्धकोष्ठता, पोटाचे विविध आजार आणि पचनाच्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते.

अर्ध मत्स्येन्द्रासन- हे आसन शरीराच्या अनेक अवयवांना बळकट होण्यासाठी मदत करतं. यामुळे किडनी, पोट, स्वादुपिंड, यकृत आणि कोलन ताणून पचन सुधारण्यास मदत होते. यामुळे शरीर डिटॉक्स Detox होण्यासाठी मदत होते.

तसचं आतड्यांचं कार्य सुरळीत होतं. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर नियमितपणे अर्ध मत्स्येन्द्रासन केल्याने नक्कीच फायदा होईल,

अशा प्रकारे योग्य आहारासोबतच जर तुम्ही नियमितपणे ही योगासनं केलीत तर तुमची बद्धकोष्ठतेची आणि गॅसची समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT