Marjaryasana Benefits: Sakal
आरोग्य

Marjaryasana Benefits: फक्त 10 मिनिटे काढा अन् रोज मार्जारासन करा, दिवसभर राहाल उत्साही

दिवसभर उत्साही राहायचे असेल तर मार्जारासन करू शकता.

Puja Bonkile

Marjaryasana Benefits cat yoga pose in yoga for health and laziness in morning

जर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटत नसेल आणि शांत झोप येत नसेल तर व्यायाम करणे गरजेचे आहे. सकाळी व्यायाम केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. तुमच्या निरोगी आरोग्यासाठी सकाळी 10 मिनिटं काढून योग केल्यास थकवा,आळस कमी होतो. यासाठी मार्जारासन करू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे आणि ते कसे करावे.

मार्जारासन कसा करावा

मार्जारासन करण्यासाठी सर्वात आधी सपाट जागेवर खाली सरळ बसावे. नंतर दोन्ही गुडघे पुढे नेऊन गुडघ्यांवर बसावे.

नंतर दोन्ही हात गुडघ्याच्या पुढे न्या आणि खाली टेकवा.

त्यानंतर दोन्ही हातांच्या मनगटांवर भार टाकत नितंबाचा भाग वर आणायचा प्रयत्न करा.

दोन्ही मांड्यावरच्या बाजूला नेत सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करा.

या मुद्रेमध्ये तुमच्या छातीचा भाग जमिनिला समांतर असेल,समोरून पाहणाऱ्याला तुम्ही मांजरीच्या पोझमध्ये दिसाल.

नंतर मोठा श्वास घ्या आणि डोक्याचा भाग मागच्या बाजूला आणा. यानंतर पाठीचा कणाच्या शेवटचा भाग वर आणण्याचा प्रयत्न करा.

आता श्वास सोडताना डोके खाली नेऊन तोंडाखालच्या हनुवटीने छातीला स्पर्श करा.

मार्जारासन करण्याचे फायदे

पाठदुखी कमी

अनेक लोक लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करतात. अशा लोकांना मान आणि पाठदुखीचा त्रास होतो. हा योग केल्याने पाठदुखी कमी होते.

मन शांत राहते

हा योग केल्याने शरीर आणि मन दोन्ही शांत राहते. तसेच तुम्ही कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता.

गंभीर आजार दूर राहतात

तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. हा योग नियमित केल्यास अनेक प्रकारचे आजार दूर राहतात.

शरीराचे संतुलन

हा योग केल्याने शरीराचे संतुलन सुधारते आणि आसनाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.

पाठीचा कणा

नियमितपणे सकाळी हा योग केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो आणि पाठीचा कणा मजबूत होतो.

तणाव कमी

मधल्या पाठीचा, पाठीचा खालचा भाग, मान आणि खांद्याचा त्रास निघून जातो. तसेच तणावही कमी होतो.

स्नायू मजबूत

यामुळे मुख्य स्नायू मजबूत होतात आणि शरीरात स्थिरता वाढते.

मनगट दुखी

हा योग केल्याने हात, खांदे आणि मनगट दुखण्यापासून आराम मिळतो.

पचनक्रिया

मार्जारासन केल्याने पचनक्रिया मजबूत होते. तसेच गुडघ्याचे सांधे दीर्घकाळ मजबूत राहतात.

चांगली झोप

हा योग केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते आणि झोपताना ताण कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Airstrike Iran : जग युद्धाच्या उंबरठ्यावर! डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला धुडकावून इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला

Ratnagiri Monsoon Update 2026 : कोकणात पाऊस कधी जोर धरणार? रत्नागिरी-सिंधुदुर्गात 9 जूनपर्यंत अलर्ट; IMD चा नवा अंदाज, तळकोकणात मॉन्सूनची काय स्थिती?

Mumbai Marathi Schools: मुंबईतील मराठी शाळांवर संकट; ५७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, संचमान्यता निकषांवर प्रश्नचिन्ह

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

SCROLL FOR NEXT