acne
acne google
आरोग्य

Physical Health : तुमच्या शरीरावरील पुरळ हस्तमैथुनामुळे आले आहेत का ? जाणून घ्या सत्य

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : हस्तमैथुन ही खासगी बाब आहे आणि बहुतेक लोक त्याबद्दल बोलू इच्छित नाहीत. जर तुम्ही हस्तमैथुन आणि पुरळ यांसारखे कीवर्ड गुगलवर शोधले तर तुम्हाला असे आढळेल की, याबद्दल सर्वात जास्त विचारले जाणारा प्रश्न म्हणजे हस्तमैथुन केल्याने चेहऱ्यावर आणि शरीरावर पिंपल्स होतात का ?

चेहऱ्यावरील पिंपल्सची तक्रार महिला आणि पुरुष दोघांमध्येही असते. पण हे खरंच हस्तमैथुनामुळे होते का ? लॅप सर्जन आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गरिमा श्रीवास्तव यांनी यासंबंधीची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (facts and myths of masturbation) हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

हस्तमैथुनामुळे खरंच मुरुमं येतात का ?

डॉक्टर गरिमा यांच्या मते, तसे अजिबात नाही. ही एक मिथक आहे. पुरळ हे हस्तमैथुनामुळे होते असे सूचित करणारा कोणताही वैज्ञानिक अभ्यास नाही. हस्तमैथुन ही स्त्री आणि पुरुष दोघांसाठी अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. हे रोज केल्यानेही मुरुमांची समस्या असेलच असे नाही.

हे मिथक हस्तमैथुनाशी का जोडले जाते ?

डॉ. गरिमा यांच्या म्हणण्यानुसार, पुरळ हे बहुतेक तारुण्यादरम्यान होतात. यादरम्यान हस्तमैथुन करण्याची इच्छाही अधिक तीव्र होते. हा सगळा संप्रेरकांचा खेळ आहे, त्यामुळे हस्तमैथुन हे मुरुमांचे कारण आहे असे लोक समजू लागतात.

हस्तमैथुन आणि पुरळ यांच्यातील संबंध

हस्तमैथुन केल्यानंतर हात व्यवस्थित धुणे महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळा जननेंद्रियामध्ये असलेले बॅक्टेरिया चेहऱ्यावर किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात शिरले तर मुरुमांची समस्या उद्भवू शकते.

हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल, तर जननेंद्रियातील बॅक्टेरियामुळे मुरुमे होण्याची शक्यता असते.

हस्तमैथुनाबद्दल इतर काही मिथके

मासिक पाळीदरम्यान हस्तमैथुन करू नये

हे योग्य नाही. मासिक पाळीदरम्यान हे करत असताना, तुम्हाला स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. याशिवाय, बाकी सर्व काही सामान्य आहे.

जास्त हस्तमैथुन केल्याने नसा कमकुवत होतात

हे तथ्य सिद्ध करण्यासाठी कोणताही वैज्ञानिक अभ्यास नाही. हस्तमैथुनामुळे अशक्तपणा किंवा लैंगिक शक्ती नष्ट होण्यासारखे काहीही होत नाही.

हस्तमैथुनाचे व्यसन होऊ शकते

हस्तमैथुनाची सवय होते की नाही हे पूर्णपणे त्या व्यक्तीच्या सेक्स ड्राइव्हवर अवलंबून असते. फक्त हस्तमैथुन केल्याने ती सवय होत नाही.

ठरावीक वयानंतर हस्तमैथुन थांबते

इथे तुमच्या सेक्स ड्राइव्हवरही हस्तमैथुनाचा परिणाम होतो. वयाच्या एका टप्प्यानंतर हस्तमैथुन कमी केले पाहिजे असे नाही. तुमची सेक्स ड्राइव्ह योग्य असेल तर हस्तमैथुन थांबवण्याची गरज भासणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT