mental health 80 percent of citizens without treatment Lack of awareness causes stigma Sakal
आरोग्य

Mental Health : मानसिक आरोग्याकडे भारतीयांचे दुर्लक्षच!

८० टक्के नागरिक उपचाराविना; जागरूकतेचा अभाव, कलंक कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जगभरात मानसिक आरोग्यासंदर्भातील तक्रारी वाढत आहेत. मात्र, मानसिक आरोग्याकडे आजही म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या भारतीयांपैकी सुमारे ८० टक्के जण उपचार घेत नाहीत. जागरूकतेचा अभाव, दुर्लक्ष व मानसिक आजारांवर कलंक असल्याने सहजतेने उपचार घेतले जात नाहीत, असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मानसिक आरोग्याची व्यापकता लक्षात घेऊन वेळेवर मदत घेण्यासाठी शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही शिक्षणप्रणालीचा अविभाज्य भाग असायला हवा, असेही मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

‘एम्स’ मधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार म्हणाले, की मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यापासून वेगळे केले जाऊ शकत नाही आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळता येत नाही. त्यामुळे, शाळा आणि महाविद्यालय स्तरावरच मन आणि शरीराच्या नात्याबद्दल जागरूकता वाढविण्याची गरज आहे.

त्यामुळे, मानसिक आरोग्याच्या समस्यांचे लवकर निदान होऊ शकेल. लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव आहे. अनेकवेळा मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्या दुर्लक्षितच राहतात.

लक्षणांना सुरूवात झाल्यावर प्रत्यक्ष उपचार सुरू करण्यातील कालावधी बराच मोठाअसल्याने गुंतागुंत वाढत जाते. संबंधित व्यक्ती आजारी आहे, हे आपण जोपर्यंत ओळखतच नाही तोपर्यंत त्या व्यक्तीवर उपचार कसे करणार, असा सवालही त्यांनी केला. मानसिक आजारांचा परीघ व्यापक असून त्यात निद्रानाश, सौम्य चिंता विकार आणि नैराश्य, तीव्र मूड विकार आदींचा समावेश होतो.

त्यामुळे, रुग्णाला आपला नेमका आजार कोणता आहे किंवा मुळात आजार आहे का, हे ओळखणे अवघड जाते. युवकांमध्येही मनोविकारांचे प्रमाण मोठे असून पौगंडावस्थेतील समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष होते. त्याचप्रमाणे, मानसिक आजारांवरील कलंक आणि भेदभाव लोकांना उपचार घेण्यापासून परावृत्त करतो, असेही त्यांनी सांगितले.

मानसोपचारतज्ज्ञ सृष्टी अस्थाना यांनी मानसिक आजारांवरील उपचाराचा खर्च व लागणारा प्रदीर्घ वेळ आदींमुळेही लोक पुढे येत नसल्याचे अधोरेखित केले.

शारीरिक व मानसिक सक्रियता गरजेची

खासगी रुग्णालयांत उपचाराचा खर्च अधिक असून सरकारी रुग्णालयांतील गर्दीमुळे लोक उपचार घेण्याचे टाळतात. त्याचप्रमाणे, मानसोपचारतज्ज्ञांची अपुऱ्या संख्येचा मुद्दाही त्यांनी मांडला. मात्र, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केवळ मनोविकारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांची संख्या वाढवून थांबणार नाहीत तर सामाजिक एकसंधतेला प्रोत्साहन, शारीरिक व मानसिक सक्रियता व सांस्कृतिक एकात्मता हे मुद्देही महत्त्वाचे असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सृष्टी अस्थाना यांनी सांगितले.

देशातील मनोविकारतज्ज्ञ

  • ६,००० - २०१६

  • ९,००० - २०२३

  • १.३० लाख - २०१६

  • १.६४ लाख - २०२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT