Mental health esakal
आरोग्य

Mental Health : निरोगी लोकांनाही येऊ शकतो एंजाइटी अटॅक; वेळीच सावध व्हा!

लोकांना एंजाइटी अटॅकची कारणे माहीत नसल्याने त्याकडे दुर्लक्षही केले जाते

सकाळ डिजिटल टीम

तूम्ही एक वाक्य सतत ऐकले असेल, चिंता हे चिता समान आहे. दोन्ही शब्दात फक्त अनुस्वाराचाच फरक आहे. चिता हे मनुष्याच्या मरण पावल्या नंतर जाळते परंतु चिंता हे जिवंतपणे मनुष्याला जाळत राहते. त्याचप्रमाणे जीवनात समस्या आणि चिंता सुरूच असतात. परंतु नेहमी काळजीत राहणे हे चिंता विकार आणि वाईट मानसिक आरोग्याचे लक्षण असू शकते. या विकारामुळे रुग्णाचे जीवन आव्हानात्मक बनते आणि त्याला सामान्य कामे करण्यातही अडचणी येतात.

तूम्ही एक वाक्य सतत ऐकले असेल, चिंता हे चिता समान आहे. दोन्ही शब्दात फक्त अनुस्वाराचाच फरक आहे. चिता हे मनुष्याच्या मरण पावल्या नंतर जाळते परंतु चिंता हे जिवंतपणे मनुष्याला जाळत राहते. त्याचप्रमाणे जीवनात समस्या आणि चिंता सुरूच असतात. परंतु नेहमी काळजीत राहणे हे चिंता विकार आणि वाईट मानसिक आरोग्याचे लक्षण असू शकते. या विकारामुळे रुग्णाचे जीवन आव्हानात्मक बनते आणि त्याला सामान्य कामे करण्यातही अडचणी येतात.

एंजाइटी अटॅकचे कारण? एंजाइटी  विकारामध्ये, रुग्णाला अनेक वेळा अशा अटॅकला सामोरे जावे लागते. अनेकदा लोकांना असे वाटते की या अटॅकमागे केवळ आपण करत असलेली अती काळजी आहे. लोकांना एंजाइटी अटॅकची कारणे माहीत नसल्याने त्याकडे दुर्लक्षही केले जाते.

लक्षणे

जास्त भीती वाटणे, हृदयाचे ठोके तिव्र होणे, घाम येणे, शरीर थरथर कापणे, तिव्र श्वासोच्छवास, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, छातीत दुखणे, मळमळ, चक्कर येणे, आणि हात पाय सुन्न होणे.

एंजाइटी अटॅक येण्याची कारणे

तज्ज्ञांच्या मते,एंजाइटी  होण्यामागे मानसिक थकवा हे कारण असू शकते. जेव्हा शरीर शारीरिक किंवा भावनिक तणावाखाली असते, तेव्हा अधिवृक्क ग्रंथी कॉर्टिसॉलसारखे तणावपूर्वक संप्रेरके तयार करतात. हि संप्रेरकेच एंजाइटी अटॅक येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

ग्लूटेन सेंसिटिविटी और सीलिएक डिजीज  हे ग्लूटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने होणारे आजार आहेत. काही संशोधनांनी असे सुचवले आहे की ग्लूटेन नसलेले पदार्थ खाल्ल्याने ग्लूटेन ऍलर्जी असलेल्या रुग्णांमध्ये हा आजार कमी होऊ शकतो.

जेव्हा तुमचे आतडे आणि पोटाची समस्या सुरू होते. तेव्हा मेंदूला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. सतत पोटाची तक्रार असेल तर चिंता, तणाव किंवा नैराश्य यासारख्या मानसिक समस्या उद्भवू लागतात.

शरीराला लागणाऱ्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील एंजाइटी  अटॅक येऊ शकतात. व्हिटॅमिन बी 6 आणि लोहाची कमतरता असलेल्या लोकांना एंजाइटी  आणि पॅनीक अटॅक जास्त येतात. मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सेरोटोनिन हार्मोनच्या आवश्यक असते. या हार्मोनच्या निर्मितीसाठी ही दोन्ही पोषक तत्वे आवश्यक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT