actress dipti dhotre sakal
आरोग्य

‘मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचे’

मानसिकरित्या फिट असला, तर तुम्ही कधीही आणि कुठल्याही वेळी व्यायाम करू शकता. त्यासाठी मानसिकरित्या आनंदी असणं खूप गरजेचं आहे.

दीप्ती धोत्रे, अभिनेत्री

मानसिक आरोग्यासाठी मी ध्यानधारणा करते. मी स्वतः रेकी थर्ड डिग्री होल्डर आहे. त्याचा सरावही करते. हैदराबादमधील कान्हा- शांतीवनम येथील ध्यानधारणा केंद्रातील मेडिटेशनचे दोन-तीन प्रकार मी शिकले आहेत. शारीरिक एक्सरसाइजेसपेक्षा मानसिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचं असतं, असं मला वाटतं.

मानसिकरित्या फिट असला, तर तुम्ही कधीही आणि कुठल्याही वेळी व्यायाम करू शकता. त्यासाठी मानसिकरित्या आनंदी असणं खूप गरजेचं आहे. शारीरिक स्वास्थ्यासाठी मी खूप वर्षांपासून जिम्नॅस्टिक करत आहे. शाळेत असताना मी मार्शल आर्ट करत होते. मात्र, शिक्षण घेत असताना त्यात खंड पडला. कॉलेजमध्ये बास्केटबॉल स्पर्धेत सहभागी होत असे. त्यानंतर मी अभिनय क्षेत्रात आले. त्यावेळी फिटनेसचं महत्त्व आणखीनच समजलं.

अभिनयात आल्यानंतर मी योगासनं सुरू केली. त्यामुळे मानसिकदृष्ट्या फायदा झाला. मात्र, मला टोन्ड बॉडी हवी होती. त्यामुळे जिमला जात असे; पण मी मैदानावर खेळत असल्याने या दोन्हीही गोष्टी नकोशा वाटू लागल्या. मी अंधेरीत राहत होते. त्यावेळी जिम्नॅस्टिक करू लागले.

हे स्ट्रेचिंग वर्कआउट असून ध्यानधारणाही होते. यात खूप लक्ष केंद्रित करावं लागतं. त्याचा मला खूप फायदा झाला. त्यामुळे सात ते आठ वर्षांपासून मी जिम्नॅस्टिक करते. तसेच, मल्लखांबही करत आहे.  ज्यावेळी मला वेट्स करायचे असतात, त्याचवेळी मी जिममध्ये जाते.

गेल्या तीन-चार वर्षांपासून योगसाधनेबद्दल माझा अभ्यास सुरू आहे. कोरोनाकाळात सोलापूरला घरी असताना मी रेकीची दीक्षा घेतली होती. खूप सरावही केली. त्याचा मला खूप फायदा झाला. लॉकडाउनच्या काळात माझं वजन दहा वर्षांत पहिल्यांदाच वाढलं होतं. ते कमी करण्यासाठी रेकीनं मला खूप मदत केली. मला वजन किती ठेवायचं असतं, त्या प्रमाणात मी आहार घेते.

दहा वर्षांपासून दररोज सकाळी उठल्यानंतर मी फळे खात असे. वजन कमी करण्यासाठी मी बुलेट कॉफी पिते. तिच्यामुळे मला खूप फरक पडला आहे. त्यानंतर फळं खातं. नाश्ता न करता काही तासांनी थेट जेवण करते. घरी शिजवलेले पदार्थ, दोन भाज्या, चपाती, सॅलड तर कधी दही खाते.

सायंकाळी एखादं बिस्कीट व कॉफी पिते. रात्री मी खूप हलकं जेवण करते. प्रोटिन बेस्ट व काप्स  खाल्ल्याशिवाय मी एक्सरसाईज करू शकत नाही. आठवड्यात एकदा मासे खाते. ज्यूसपेक्षा चावून फळं खाणं महत्त्वाचं. कारले, भेंडी, काबुली चणा, डाळी आणि पालक हे माझ्या आहारात कायम असतात.

आरोग्याबाबत टिप्स...

  • दिवसभरात २४ तासांमध्ये किमान ३० ते ६० मिनिटे स्वतःसाठी आणि स्वतःच्या शरीरासाठी वेळ द्या. 

  • पायी चाला, दोरीवर उड्या मारा, ट्रेकिंगला जा किंवा सायकलिंग करा. पोहायला जा किंवा जिमला जा; पण स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी काही ना काही करा.

  • तुम्ही जितके फिट राहाल, तितके मानसिक शांत राहाल. औषधांपासून दूर राहाल. 

  • मानसिक स्वास्थ्यासाठी काही ना काही केले पाहिजे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT