Mental Health esakal
आरोग्य

Mental Health : देशात दर तासाला १२ आत्महत्या, मानसोपचार तज्ज्ञांची माहिती

Mental Health : सध्या स्थितीत दर पाच मिनिटाला एक जण आत्महत्या करीत असल्याची चिंता मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश डिसूझा यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

Mental Health : महत्वाकांक्षा, समाजापासूनची नाळ तुटलेले, कौटुंबिक भांडणे, कुटुंबापासून दुरावलेले, एकलकोंडे व्यक्ती, आत्मकेंद्री, अहंकारी व्यक्तींपासून तर नापिकीमुळे शेतकरी आणि ताण सहन करण्याची ताकद कमी झाल्याने शाळकरी चिमुकलेही मानसिक त्रासाच्या विळख्यात अडकतात.

मानसिकदृष्ट्या अस्थिर होतात, यामुळे आत्महत्येसारखे मार्ग निवडतात. मायक्रो कुटुंबातील निकोप संवाद हरवला. याचे गंभीर परिणाम मनावर होत असून सध्या स्थितीत दर पाच मिनिटाला एक जण आत्महत्या करीत असल्याची चिंता मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश डिसूझा यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

निमित्त होते, विदर्भ सायकॅट्रिक असोसिएशन आणि सायकॅट्रिक सोसायटी ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय वार्षिक परिषद नागपुरात सुरू झाली. पार्श्वभूमीवर डॉ. अविनाश डिसूझा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रेसमुळे सर्वच क्षेत्रात स्ट्रेस वाढल्याचे नमुद करीत डॉ.डिसूझा म्हणाले, मृत्यूला अकाली कवटाळणाऱ्यांची सरासरी काढली तर दर तासाला १२ आणि दर दिवसाला २८८ जण आपली जीवनयात्रा संपवितात. टोकाला गेलेल्या नैराश्याचा सामना करणाऱ्यांना जगण्यापेक्षा मृत्यूला जवळ करणे सोयिस्कर वाटते. आत्महत्या करणाऱ्यांनी मनात मरणाचा विचार येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मित्रांशी संवाद साधल्यास जीव वाचविता येणे शक्य आहे, असे डॉ. डिसूझा म्हणाले.

कोरोनानंतर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक, आरोग्य, मानसिक, भावनिक गुंता निश्चितपणे वाढला आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल शाळा, महाविद्यालयांपुरते मर्यादित नाही. ज्या-ज्या ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती कार्यरत आहेत, अशा शाळांपासून तर कंपनी आस्थपानांसह शिकवणी वर्गातही आत्महत्या प्रतिबंधक सेल (सुसाईड प्रिव्हेंशन सेल) निर्माण करावा. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, समुपदेशकांची नियुक्ती करून नैराश्याचे ऑडिट व्हावे.

- डॉ.अविनाश डिसूझा, मानसोपचार तज्ज्ञ, मुंबई.

आत्महत्येचा प्रयत्न करणे अथवा जीवनयात्रा संपविणे हा परिणाम आहे. असे टोकाचे पाऊल उचलणारी व्यक्ती या आधी कमालीच्या नैराश्यातून जात असते. वेगवेगळ्या कारणांनी हे नैराश्य येते. जीवन नकोसे वाटू लागणे जेव्हा परमोच्च बिंदूवर जाते तेव्हा आत्महत्येला अंतिम स्वरूप येते. त्यामुळे आत्महत्या ही केवळ कृती नाही तर त्यामागे आजारी पडलेल्या मनाची अवस्था दडलेली असते.

- डॉ. शेखर शेषाद्री, निमहान्सचे मानसोपचार तज्ज्ञ, बंगळूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehru Babri Masjid Claim : नेहरू सरकारी पैशांनी बाबरी मशीद बांधणार होते, पण... राजनाथ सिंह यांचा खळबळजनक दावा

CJI SuryaKant: सुनावणीत अचानक तणाव वाढला… सरन्यायाधीशांचे शब्द ऐकून वकीलही थबकले! संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी इनसाइड स्टोरी!

Latest Marathi News Live Update : 'टीईटी' सक्तीविरोधात शुक्रवारी शाळा बंद; कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक उतरणार रस्त्यावर

रितेश देशमुख की महेश मांजरेकर: संपत्तीत कोण ‘ बिग बॉस’?

Solapur Election: 'साेलापूर जिल्ह्यात बटणे दबत नसल्याने बदलली १९ मतदान यंत्रे'; भाजप उमेदवाराच्या पतीने आपटले मिशन, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT