Midnight Hunger sakal
आरोग्य

Midnight Hunger: मध्यरात्री तुम्हालाही भूक लागते? ट्राय करा हे बेस्ट ऑप्शन, गॅसेसचं घालवा टेन्शन

मध्यरात्री काहीतरी हलके फुलके खाण्याच्या नादात अनेकदा आपण अनहेल्दी किंवा डीप फ्राइड स्नॅक्स खातो.

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा अचानक रात्री जाग येते आणि काहीतरी खावसं वाटतं किंवा काही लोकांना मध्यरात्री भूक लागते. मग अशावेळी काय खावं काय नाही, असा प्रश्न निर्माण होतो. मग काहीतरी हलके फुलके खाण्याच्या नादात अनेकदा आपण अनहेल्दी किंवा डीप फ्राइड स्नॅक्स खातो.

मात्र यामुळे छातीत जळजळ आणि अॅसिडीटीची समस्या निर्माण होते किंवा सकाळी पोट खराब होते. पण आज आम्ही तुम्हाला मध्यरात्री खाण्यासाठी काही बेस्ट हेल्दी ऑप्शन्स सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. चला तर जाणून घेऊया.

  • रात्री जोरदार भूक लागली तर तुम्ही दूध पिऊ शकता. मात्र दुधमध्ये साखर टाकण्याऐवजी तुम्ही मध टाकून पिऊ शकता. जर उन्हाळ्यात रात्री भुकेमुळे झोप उघडली तर तुम्ही दूधमध्ये साखर मिक्स न करता पिऊ शकता पण थंडीच्या दिवसात दूध गरम करुन प्यावे. असं दूध पिल्यास भूक पण भागते आणि कोणती समस्याही निर्माण होत नाही.

  • मध्यरात्री भूक लागल्यास प्लेन पनीर खाऊ शकता. जर तुम्हाला स्वाद वाढवायचा असेल तर तुम्ही पनीरवर काळ्या मिरचीचे पावडर किंवा धनिया पावडर टाकू शकता. पण तुम्ही पनीरवर चुकूनही मीठ टाकू नका. आयुर्वेदनुसार असे करणे आरोग्यासाठी चुकीचं आहे.

  • मध्यरात्री केळी खाणे एक सर्वोत्तम पर्याय आहे. 12 महीने उपलब्ध असणारे आणि स्वस्तात मस्त असणारे केळी तुम्ही मध्यरात्री केव्हापण खाऊ शकता. प्लेन केळी कधीच खाऊ नका त्यावर मीठ टाकून खा. यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

  • जर तुम्हाला रात्री भूक लागली तर गव्हाच्या पीठापासून किंवा रवापासून बनविलेले कुकीज आणि बिस्किट्स खाऊ शकता. यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.

  • तुम्ही मध्यरात्री ओट्सपण खाऊ शकता. ओट्स तुम्ही सहज आणि फास्ट बनवू शकता आणि डायजेस्ट करण्यातही ओट्स उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

Video Viral: क्रिकेटच्या मैदानात बाप-लेक भिडले! नबीच्या पहिल्याच चेंडूवर मुलानं मारला खणखणीत सिक्स

Ahmedabad Plane Crash: ''इंधन पुरवठा नियंत्रकात त्रुटी नाही'', एअर इंडियाकडून बोइंग विमानांच्या एफसीएसचा अहवाल सादर

Walmik Karad: वाल्मिकच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला पण मालमत्तेचं काय होणार? उज्ज्वल निकम केस लढणार का?

ENG vs IND: इंग्लंडच्या ओपनर्सला का फैलावर घेतलं? शुभमन गिलने केली पोलखोल; त्यांचा रडीचा डाव जगासमोर आणला

SCROLL FOR NEXT