mobile internet data pack wifi sim card
mobile internet data pack wifi sim card esakal
आरोग्य

Swasthyam 2023 : मोह मोह के धागे...

सकाळ वृत्तसेवा

मोहजालात अडकण्याची सुरुवात डेटा पॅकने होते. अगदी सुरुवातीला जेमतेम काही ‘केबी’मध्ये मिळणारा डेटा अचानक ‘जीबी’मध्ये मिळायला लागला.

वैशाली मंडपे

जगभरात पसरलेल्या इंटरनेटच्या आंतरजालाने सगळ्यांनाच आपल्या मोहपाशात जखडले आहे. या मोहजालात अडकण्याची सुरुवात डेटा पॅकने होते. अगदी सुरुवातीला जेमतेम काही ‘केबी’मध्ये मिळणारा डेटा अचानक ‘जीबी’मध्ये मिळायला लागला.

फक्त थोडे पैसे जास्त दिले तर रोज १ ऐवजी ३ ‘जीबी’ हे आमिष दाखवून नेटवर्क कंपन्यांनी लोकांना जास्तीत जास्त डेटा पॅक मारण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. मग आणखी थोडे मोहात पडून लोकांनी फॅमिली पॅकेज घेऊन वर्षभराचे बुकिंगही केले.

मोबाईलमधील डबल सिमकार्डची सुविधा आणि एक सिमकार्ड बंद पडले तर दुसरे असावे म्हणून प्रत्येक मोबाईलमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन सिमकार्ड तर हमखास असतात. त्या दोन्ही सिमकार्डवर वेगवेगळे डेटा पॅक आणि प्रत्येकाचा पुन्हा काही ‘जीबी’ फ्री डेटा.

ऑनलाइन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होममुळे घरोघरी ‘वाय-फाय’चे कनेक्शन आले. मग काय विचारता, हवे तेवढे इंटरनेट. आणि सुरू झाला एक न संपणारा मोहपाश. रोजचा डेटा पॅक वाया कशाला घालवा. त्यासाठी उगाचच सर्फिंग सुरू झाले.

सोशल मीडियावरचा लोकांचा वावर वाढला. मध्येच झळकणाऱ्या डिस्काउंटच्या जाहिरातीने गरज नसतानाही ऑनलाइन शॉपिंग सुरू झाले. घरोघरी आता स्मार्ट टीव्ही आहेतच. काही जणांनी तर स्वतंत्र होम थिएटरची घरातच सुविधा केली. नवनवीन सिनेमा आणि वेबसिरीज पहाण्यासाठी नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइमच सबस्क्रिप्शन ओघानेच आले.

यू-ट्यूबवरच्या व्हिडिओ आणि बोल्ड वेबसिरिज पाहता पाहता पोर्न बघण्याचे प्रमाण वाढले. मोठ्यांबरोबर लहान मुलेही उत्सुकतेपोटी नको त्या गोष्टीत रमू लागली. याचा एकूणच परिणाम वैयक्तिक, तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे.

पोक्सो आणि सेक्सटॉर्शनच्या वाढत्या गुन्ह्यांची संख्या आणि अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यातील सहभाग पाहता हा चिंताजनक विषय ठरत आहे. मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेतला जाणार नाही, मात्र दैनंदिन डेटा पॅकवरच नियंत्रण ठेवल्यास आपोआपच आपला स्क्रीन टाइम कमी करता येईल.

महत्त्वाचं; डेटा पॅकचं अर्थकारण ; घरात प्रत्येक सदस्याकडे स्वतःचा मोबाईल आहेच. चार जणांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा महिन्याचा डेटा पॅक कमीत कमी ४९९ रुपयांचा. प्रत्येकाचे दोन सिमकार्ड. एकूण आपण फक्त डेटा पॅकवर विनाकारण किती पैसे खर्च करतो? आणि या पैशातून आपण आपले मानसिक स्वास्थ्य गमावण्यापलीकडे काय मिळवतो, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT