Momos Side Effects
Momos Side Effects  esakal
आरोग्य

Momos Side Effects : तुम्हीही मोमोजचे चाहते आहात? मोमोज खाण्याआधी हे नक्की वाचा

धनश्री भावसार-बगाडे

Health Issues Causes Due To Momos :

फास्ट फुड म्हणून मोमोज अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. हिमालयाची फेमस डिश असलेल्या मोमोजचे स्टॉल गल्लोगल्लीत सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या मोमोज अनेकांचे फेव्हरेट फुड झाले आहे. त्यात स्ट्रीट फुड म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.

पण हेच स्ट्रीट फुड तुमच्या जीवावर उठू शकते. अतिप्रमाणात किंवा रोज रोज मोमोज खाणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकतात. मोमोज खाल्ल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतात. मोमो अतिप्रमाणात खाण्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात ते पाहूयात.

कशात शिजवता हे महत्त्वाचे

सगळ्यात पहिले ते मोमोज हे अॅल्युमिनियम स्टीमर्समध्ये शिजवले जातात आणि अॅल्युमिनियम हे शरीरासाठी हानिकारक असतात. तसंच, मोमोज मैद्यापासून बनवले जातात. मैदा हा आल्मयुक्त असतो. हे पीठ शरीरात जाऊन हाडांचे कॅल्शियम शोषून घेते. तसंच, मैदा नीट पचतही नाही. तसंच, मैदा खाल्ल्याने अॅसिटिडी, ब्लॉटिंग, बद्धकोष्टता असे आजार मागे लागू शकतात.

रासायनिक पदार्थांचा वापर

दुसर कारण म्हणजे बाजारात बनवलेले मोमोज हे पांढरे असतात तर घरी बनवलेले मोमोज हे थोडेसे पिवळसर दिसतात. बाहेर बनवल्या जाणाऱ्या मोमोजमध्ये ब्लीच, क्लोरीन वायू, बेंझॉइल पेरोक्साइड, अझो कार्बामाइड युक्त असतात. त्यामुळं ते पांढरे आणि मऊ दिसतात. या रसायनांमुळे किडनी आणि स्वादुपिंडाचे नुकसान होते आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो.

चटणीची गुणवत्ता कमी असते

मोमोजसोबत दिली जाणारी लाल चटणीही आवडीने खाल्ली जाते. तिखट अशी ही चटणीदेखील शरीरासाठी हानिकारक असते. कारण या चटणीची गुणवत्ता कमी असते. ज्यामुळं मूळव्याध, जठराची सूज, पोट आणि आतड्यांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो.

मोनोसोडियम, अजिनोमोटो घातक

काही मोमोज विक्रेते मोमोजमध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट आणि अजिनोमोटो नावाच्या रसायनाचा वापर करतात. यामुळे त्याची चव वाढते आणि ते सुगंधी बनते. या एमएसजीमुळे लठ्ठपणा वाढतो. मेंदू आणि मज्जातंतूंच्या समस्या, छातीत दुखणे, हृदय गती वाढणे, बीपी अशा तक्रारी निर्माण होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT