Monsoon Eye Care esakal
आरोग्य

Monsoon Eye Care : पावसाळ्यात डोळ्यांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना 'अशी' घ्या काळजी

Monsoon Eye Care : पावसाळ्यात संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो.

सकाळ वृत्तसेवा

Monsoon Eye Care : पावसाळ्यात संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. यामुळे पावसात घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वस्तू ओल्या होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी. या ऋतूमध्ये त्वचा आणि डोळ्यांमध्ये संसर्गाची जोखीमही सर्वाधिक आहे. ओलाव्यामुळे चष्मा घालतानाही त्रास होतो. यामुळे अनेक जण कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात.

मात्र पावसाचे पाणी कॉन्टॅक्ट लेंन्सच्या आत जाऊन संसर्गाची जोखीम अधिक वाढते, तसेच हातापासूनच डोळ्यांपर्यंत संसर्ग पसरत असल्याचे निरीक्षण नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. पावसाळ्यात डोळ्यांचा फ्लू किंवा डोळ्यांचा संसर्गाचा धोका अधिक असतो.

नळाचे पाणी, स्वीमिंग पूल, हॉट टब अशा ठिकाणी अकॅन्थामोएबा नावाचे जीव पाण्यात राहातात. पावसाळ्यात हे जीव सहज डोळ्यांना संसर्ग करू शकतात. यामुळे लेन्स स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरू नये. शक्यतो पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नका, असे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निलेश गादेवार म्हणाले.

डोळ्यांना संसर्ग झाल्यास होणारी लक्षणे :

डोळ्यांत जळजळ होणे

डोळे लाल होणे

केरायटिस अर्थात कॉर्नियाचा संसर्ग

डोळे कोरडे होणे

डोळ्यांमध्ये वेदनादायी ओरखडा

डोळ्यांत सूज येणे

डोळे गुलाबी होणे

फंगल इन्फेक्शन होणे

कॉन्टॅक्ट लेन्समुळे संसर्गाची कारणे

कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपणे

अंघोळ घालताना, पोहताना लेन्स घालणे

लेन्स घालून पावसात भिजणे

लेन्स लावल्यानंतर वारंवार हाताने स्पर्श करणे

दुसऱ्याच्या लेन्स वापरणे.

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्समुळे बुबुळाच्या पुढील भागाला संसर्ग होणे सामान्य आहे. मात्र बुबुळांच्या पुढील भागाला होणारा दाह जोखमीचा असतो. पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यानंतर अशी लक्षणे आढळली की, स्वतःच डॉक्टर बनून औषधांच्या दुकानातून प्रतिजैविक औषधी घेऊ नये. औषधोपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. नीलेश गादेवार, सहयोगी प्राध्यापक, नेत्ररोग विभाग, मेडिकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT