Monsoon Health esakal
आरोग्य

Monsoon Health : पावसाळ्यात आजारांना दूर ठेवण्यासाठी तुमच्या रूटीनमध्ये 'या' काढ्यांचा करा समावेश, रोगप्रितिकारक शक्ती होईल मजबूत

Monsoon Health : पावसाळ्यात शरीर निरोगी आणि तंदूरूस्त ठेवण्यासाठी आपण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Monsoon Health : सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. आज राज्यात हवामान विभागाने देखील पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाळ्यात थंडी आणि पावसामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. खास करून लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्ती या संसर्गजन्य आजारांना बळी पडतात.

अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला निरोगी आणि तंदूरूस्त ठेवण्यासाठी आपण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही आहारात योग्य बदल करून तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यासाठी तुम्ही आयुर्वेदिक काढ्यांची मदत घेऊ शकता.

या काढ्यांच्या मदतीने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता आणि ताप-सर्दीसारख्या संसर्गजन्य आजारांना दूर ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात काही इम्युनिटी बूस्टर आयुर्वेदिक काढ्यांबद्दल.

आलं अन् तुळशीचा काढा

तुळस ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. धार्मिक महत्व असण्यासोबतच तुळस तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ही ओळखली जाते. तुळशीसोबतच आलं देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण, आल्यामध्ये अनेक पोषकतत्वांचा समावेश आढळून येतो.

आलं-तुळशीचा काढा बनवण्यासाठी सर्वात आधी तुळशीची पाने आणि किसलेलं आलं पाण्यात ५-७ मिनिटे उकळवा. त्यानंतर, हे मिश्रण गाळून त्यावर मध आणि लिंबाचा रस घालून हा काढा प्या. हा काढा प्यायल्याने विविध संसर्गांपासून आपला बचाव होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

दालचिनी-लवंगचा काढा

दालचिनी-लवंगचा वापर खास करून गरम मसाला म्हणून खाद्यपदार्थ तयार करताना केला जातो. परंतु, जेवणाला चव देण्यासोबतच या दालचिनी-लवंगमध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे, लवंग-दालचिनीचा काढा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हा काढा बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यात एक दालचिनी आणि चार-पाच लवंग घ्या.

हे दोन्ही घटक १० मिनिटे पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर, हे मिश्रण पाण्यात गाळून घ्या. आता यामध्ये १ चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून हा काढा प्या. हा काढा प्यायल्याने ताप-सर्दी, खोकला दूर होण्यास मदत होते. शिवाय, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT