आरोग्य

Mycoplasma Pneumonia : राज्यात मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची साथ, मुंबईत दोन मुलांना लागण; अशी घ्या मुलांची काळजी

राज्यात मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची साथ...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची २ बालकांना लागण झाली आहे. या दोन्ही मुलांना वरळीच्या एसआरसीसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान, मुलांना या जिवाणूंची लागण झाल्याचे आढळून आले. डॉक्टरांच्या मते, काळजी करण्यासारखे काही कारण नाही, वेळेवर उपचार आणि चांगली काळजी घेऊन मुले बरी होतात.

जरी मुलांमध्ये न्यूमोनिया सामान्य आहे, परंतु आजकाल चीनमध्ये लहान मुलांच्या न्यूमोनियाबाबत बराच गदारोळ सुरू आहे. दरम्यान, मुंबईतील वरळी येथील एसआरआरसी रुग्णालयातील दोन मुलांमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया झाला आहे. याला वॉकिंग न्यूमोनिया म्हणतात, पण वैद्यकीय भाषेत ते चुकीचे आहे, असे एसआरसीसी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले आहे.

रुग्णालयाचे क्रिटिकल केअरचे तज्ज्ञ डॉ. सोनू उधानी यांनी सांगितले की, न्यूमोनिया झालेली मुले गंभीर आजारी पडू शकतात किंवा सल्ला घेण्यासाठी रुग्णालयात येऊ शकतात. वॉकिंग निमोनिया काही नसतो. मायको प्लाझ्मा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणाऱ्या न्यूमोनियामुळे रुग्ण आमच्याकडे येतात. त्याची लक्षणे इतर निमोनियासारखी असतात ज्यात खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

रिकव्हरी साठी ४-५ दिवस -

डॉ. सोनू उधानी यांनी सांगितले की, मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाने ग्रस्त मुले ४ ते ५ दिवसात बरी होतात. सावधगिरी म्हणून, आम्ही जवळजवळ प्रत्येकाला प्रवेश देतो. जर एखाद्याला सौम्य लक्षणे असतील तरच त्याला घरी उपचार सुरू ठेवण्यास सांगितले जाते.

स्वच्छता महत्वाची -

डॉक्टरांच्या मते, हा संसर्ग खोकल्यामुळे आणि शिंकण्याने पसरतो. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT