National Banana Day esakal
आरोग्य

National Banana Day : केळीचे हे 16 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहे काय?

केळीचे एक नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत

सकाळ डिजिटल टीम

National Banana Day : आज नॅशनल बनाना डे आहे. केळीने वजन वाढते असा काही लोकांचा समज असला तर मोठ्या प्रमाणावर भारतात केळी खाणारे लोक आहेत. अनेकांना तर केळी खायला फारच आवडतं. आज आपण नॅशनल बनाना डे च्या निमित्ताने केळीचे एकूण १६ आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

केळ हे अन्य फळांपेक्षा जास्त पौष्टिक आहे. तसेच हा एनर्जीचा चांगला सोर्स आहे. चला जाणून घेऊया आरोग्यदायी फायदे.

१. केळीमधे ग्लुकोज मोठ्या प्रमाणात असतं. ते शरीराला उर्जा प्रदान करतं. केळीमधे ७५ टक्के पाणी असतं. शिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरसचा हा उत्तम सोर्स आहे.

२. शरीरात रक्त तयार होण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठीही केळी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले लोह, तांबे आणि मॅग्नेशियम रक्त निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

३. आतड्यांच्या स्वच्छतेसाठी केळी खूप फायदेशीर आहे. तसेच बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास केळी खूप गुणकारी आहे.

४. आतड्यांमधील कोणत्याही प्रकारची समस्या किंवा पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवल्यास केळीचे दह्यासोबत सेवन करणे फायदेशीर ठरते.

५. पिकलेली केळी कापून त्यात साखर मिसळून एका भांड्यात ठेवा. यानंतर हे भांडे गरम पाण्यात टाकून गरम करा. अशा प्रकारे तयार केलेले सरबत घेतल्याने खोकल्याची समस्या दूर होते.

६. जिभेवर फोड आल्यास गाईच्या दुधापासून बनवलेल्या दह्यासोबत केळीचे सेवन केल्यास फायदा होतो. यामुळे फोड बरे होतात.

७. केळीचा वापर दम्याच्या उपचारातही खूप फायदेशीर आहे. यासाठी अनेकजण केळी सालीसकट उभी कापून त्यावर मीठ आणि काळी मिरी लावून रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवतात आणि सकाळी ही केळी विस्तवावर भाजून रुग्णाला खायला देतात. असे केल्याने दम्याच्या रुग्णाला आराम मिळतो.

८. उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास आठवडाभर दुधात साखर मिसळून पिकवलेले केळ नियमित खाल्ल्यास फायदा होतो. यामुळे रक्तस्त्राव थांबतो.

९. दुखापत झाल्यास त्या ठिकाणी केळीची साल बांधल्याने सूज येत नाही. त्याच्या नियमित सेवनाने आतड्याची जळजळही संपते.

१०. शरीराचा कुठलाही भाग जळाल्यास किंवा भाजल्यास केळीचा लगदा मलम म्हणून लावल्यास त्वरित आराम मिळतो.

११. केळीच्या सालीचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. याच्या वापराने चेहऱ्यावर नैसर्गिक चमकही येते.

१२. जर महिलांमध्ये पांढर्‍या स्रावाची समस्या असेल तर दोन पिकलेल्या केळ्यांचे नियमित सेवन करणे खूप फायदेशीर आहे. एक केळ सुमारे ५ ग्रॅम शुद्ध देशी तुपासह सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने श्वेतरोग बरा होतो.

१३. काविळीच्या उपचारातही केळीचा वापर केला जातो. यासाठी केळी न सोलता ओला चुना लावून रात्रभर ठेवतात आणि सकाळी सोलल्यानंतर खाल्ल्या जातात. हे खाल्ल्याने कावीळ बरा होतो. हा प्रयोग नियमित एक ते तीन आठवडे करावा. (Health)

१४. केळी हे वजन वाढवण्यासाठीही रामबाण उपाय आहे. रोज एक पाव दुधासोबत दोन पिकलेली केळी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. साधारण महिनाभर हा प्रयोग खूप फायदेशीर ठरतो.

१५. आयुर्वेदानुसार पिकलेले केळ थंड, वीर्य वाढवणारे, पौष्टिक, मांस वाढवणारे, भूक, तहान, नेत्ररोग आणि प्रमेह यांचा नाश करणारे आहे. तर कच्ची केळी पचनास जड असल्याने कफ आणि बद्धकोष्ठता निर्माण होते.

१६. मानसिक आरोग्यासाठीही केळी खूप फायदेशीर आहे. केळी पौष्टिक आणि मेंदूला चालना देणारे फळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

Pune Bangalore Highway Accident : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला! पुणे–बंगळूर महामार्गालगत पिकअप पलटी; 11 भाविक जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ग्लेन फिलिप्स फक्त मैदानातच उडत नाही, तर आकाशात विमानही उडवतो; स्वत:च शेअर केला Video

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

SCROLL FOR NEXT