National Best Friend Day 2024 :  Sakal
आरोग्य

National Best Friend Day 2024 : मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा....; आयुष्यात जिवलग मित्रमैत्रीण असल्यास कोणते आरोग्यदायी फायदे होतात?

National Best Friend Day 2024 : आयुष्यात मित्र असण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता.

पुजा बोनकिले

National Best Friend Day 2024 : प्रत्येकाच्या जीवनात एक तरी जीवलग मित्रमैत्रीण असतो. आपण मनातील सर्व गोष्टी, समस्या, सुख-दु:ख त्याच्यासोबत शेअर करतो. तसेच जीवलग मित्राला आपण घरातील एक व्यक्तीप्रमाणाेच स्थान देतो. आयुष्यात मित्र असण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता.

एकटेपणा जाणवते नाही

आयुष्यात जीवलग मित्र-मैत्रीण असल्यास एकटेपणा जाणवत नाही. आपण सर्व गोष्टी त्याच्यासोबत शेअर करू शकतो. तसचे एकटेपणामुळे येणारे नैराश्य दूर राहते. यामुळे मानसिक आणि शारिरिक समस्या निर्माण होत नाही.

फिटनेस राहतो

जीवलग मित्रासोबत व्यायाम किंवा योगा केल्याने निरोगी आणि तंदुरूस्त राहता. एका अभ्यासात असे सांगण्यात आले की मित्रांसोबत व्यायाम केल्याने तणाव कमी होतो.

सुख-दु:खात आधार

आयुष्यात अनेक समस्या येतात. अशावेळी जीवलग मित्र असेल कोणत्याही समस्यांवर मात करू शकतो. कारण तो तुमच्या पाठीशा नेहमीच खंबीरपणे उभा असतो. यामुळे कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्यास मदत मिळते.

शारिरीक आरोग्य

जीवलग मित्रांमुळे शारिरीक आरोग्य सुधारते. कारण मनातील गोष्टी शेअर करायला कोणी असेल तर मधुमेह, हृदयविकार यासारख्या समस्या निर्माण होत नाही.

आनंदी राहतो

आयुष्यात जीवलग मित्र-मैत्रीण असल्यास आनंदी राहतो. मित्रासोबत मजा-मस्ती केल्याने मन आनंदी तर राहतेच तसेच सकारात्मकता देखील वाढते. यामुळे आठवड्यातून एकदा तरी मित्रांना भेटावे.

तणाव कमी

मैत्रीमुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते. कारण जीवलग मित्रासोबत आपण मनमोकळेपणाने बोलतो. यामुळे मन हलके होते तसचे तणाव कमी होतो.तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहते.

आत्मविश्वास वाढतो

आयुष्यात जीवलग मित्र असल्यास आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही कामात त्याचा पाठिंबा असल्याने कोणतेही काम अवघड वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT