Kidney  esakal
आरोग्य

Mumbai News : लहान मुलांमध्ये मूत्रपिंडाची वाढती गरज

मुंबईत १५ वर्षे वयोगटातील प्रतीक्षा यादी मोठी; इतर अवयवांसाठीही मागणी

भाग्यश्री भुवड

मुंबई : लहान मुलांसाठी अवयवांच्या प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे. ‘क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रा’ने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील १५ वर्षे वयोगटातील १९ मुलांना मूत्रपिंडाची गरज असल्याचे ‘पुढे आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अवयवदानाची आणि प्रत्‍यारोपणाची गरज जागतिक अवयवदानानिमित्त व्यक्त होत आहे.

अनेक अवयवांची मागणी

मूत्रपिंडासह विविध अवयवांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. हृदय, यकृत, फुफ्फुस, छोटे आतडे, हात या सर्व अवयवांसाठी सध्या प्रतीक्षा यादी आहे. मुंबईतील दहा मुलांना यकृताची गरज असून आठ जणांना हृदय, एकाला फुफ्फुस, एकाला छोटे आतडे आणि एकाला हाताची गरज आहे. ही मुले गेल्या अनेक महिन्यांपासून अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.

हृदय प्रत्‍यारोपणाला पर्याय नाही

हृदयविकाराचा त्रास असलेली अनेक मुले आहेत. या आजारावर औषधांनी नियंत्रण ठेवता येत नाही. यामधून बरे होण्‍याचा एकमेव उपचार म्‍हणजे हृदय प्रत्‍यारोपण. हृदय प्रत्‍यारोपणासाठी दाता ‘ब्रेनडेड’ रुग्‍ण असणेच आवश्‍यक आहे.

भारतात दोन-तीन राज्‍ये वगळता प्रियजनांच्‍या अवयवांचे दान करणाऱ्या कुटुंबांची संख्‍या खूप कमी आहे. महाराष्‍ट्रात अवयवदान करण्‍याचे प्रमाण चांगले आहे, पण अजूनही लांबचा पल्‍ला गाठायचा आहे. हृदयविषयक आजाराने पीडित मुलांचे हृदय प्रत्‍यारोपण झाले नाही तर त्‍याला आपला जीव गमवावा लागू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

मुंबईतील प्रतीक्षा यादी

अवयव    - १५ वर्षांपर्यंत   -   १८ वर्षांवरील

मूत्रपिंड     -    १९           -  ३३९०

यकृत        -    १०     -         ५१७

हृदय       -      ०८          -      ५४

फुफ्फुस      -   ०१             -   २५

स्वादुपिंड     -  ००             -   १४

छोटे आतडे     - ०१             -   ०१

हात            -  ०१            -    ०४

मूल प्रतीक्षा यादीत असताना त्‍यांच्‍यावर गोळ्यांसह औषधोपचार करता येतो; पण काही काही मुले इतकी आजारी पडतात की, त्‍यांना रुग्णालयातच दाखल करावे लागते. कधी-कधी काही मुलांवर घरीच ‘आयव्‍ही’ औषधोपचार केले जातात. या औषधोपचारानंतरही प्रकृती स्थिर होऊ न शकणाऱ्या अत्‍यंत आजारी मुलांना त्‍यांचे हृदय प्रत्‍यारोपण होईपर्यंत व्हेंट्रिक्‍युलर असिस्‍ट डिव्हाईसेस (व्‍हीएडी) या विशेष उपकरणाची गरज असते.

- डॉ. स्‍वाती गरेकर, वरिष्ठ सल्लागार, बाल हृदयरुग्ण विभाग, फोर्टिस रुग्णालय,मुलुंड

प्रतीक्षा यादी जेवढी आहे, तेवढे अवयवदान होत नाही. मात्र सध्या अवयवदानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ. भरत शहा, सचिव, झेडटीसीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

Women’s World Cup 2025: 'शेफाली वर्माला महिला संघातून वगळले'; विश्‍वकरंडकासाठी भारताचा संघ जाहीर, रेणुका सिंगचा समावेश

Mata Lakshmi: माता लक्ष्मी रात्री 'या' ठिकाणी करते भ्रमण, वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT