Health Care  esakal
आरोग्य

Health Care : रात्री झोपेची समस्या भेडसावतेय? मग, संध्याकाळी ६ नंतर 'हे' पदार्थ खाऊ नका

रात्रीचे जागरण केल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्याने आजकाल झोप न येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, थकवा येणे, अशक्तपणा येणे आणि निद्रानाशाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : रोजचे धावपळीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यात सोशल मीडियाचा वाढलेला वापर, यामुळे रात्रीचे होणारे जागरण इत्यादी कारणांमुळे, शारिरीक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होताना दिसत आहे.

रात्रीचे जागरण केल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्याने आजकाल झोप न येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, थकवा येणे, डोळ्यांना सूज येणे, अशक्तपणा येणे आणि निद्रानाशाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मग, ही झोपेची समस्या कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र, तरी ही म्हणावा तसा फरक पडत नाही.

अनेकदा असे होते की, चुकीच्या आहारामुळे देखील झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे, हे पदार्थ संध्याकाळी ५-६ नंतर खाणे टाळायला हवेत. कोणते आहेत हे पदार्थ? जे तुम्ही संध्याकाळ झाल्यानंतर खाणे टाळायला हवे. चला तर मग जाणून घेऊयात या पदार्थांबदद्ल.

कॉफीचे सेवन करू नका

आपल्यातील अनेक जणांना रात्री झोपण्यापूर्वी कॉफी प्यायला आवडते. मात्र, रात्री झोपण्यापूर्वी कॉफीचे सेवन केल्याने झोप न येण्याची समस्या निर्माण होते. खरे तर कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या शरीरातील सतर्कता वाढवते. त्यामुळे, आपला मूड फ्रेश राहतो आणि लवकर झोप येत नाही.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते जेव्हा आपण कॉफी पितो, तेव्हा त्या कॉफीमधील उत्तेजक प्रभाव हा ३-५ तास टिकतो आणि झोप येत नाही. त्यामुळे, संध्याकाळी ६ नंतर शक्यतो कोणत्याही प्रकारच्या कॉफीचे सेवन करणे टाळा.

लिंबूवर्गीय फळांचे सेवन करणे टाळा

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेल्या फळांचा लिंबूवर्गीय फळांमध्ये समावेश आढळून येतो. या फळांमध्ये लिंबू, संत्रा आणि टोमॅटो इत्यादी फळांचा समावेश असतो. जेव्हा संध्याकाळी ६ नंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपण ही लिंबूवर्गीय रसदार फळे खातो, तेव्हा त्याचा आपल्या झोपेवर नकारात्मक परिणाम होतो.

यामध्ये असलेले टायरामाईन हे अमिनो अ‍ॅसिड आपल्या शरीराला सक्रिय बनवते. त्यामुळे, झोप न येण्याची समस्या वाढते. शिवाय, झोपण्यापूर्वी आंबट-गोड फळांचे सेवन केल्याने शरीरात मोठ्या प्रमाणात ॲसिड तयार होते. त्यामुळे, ॲसिडिटीची समस्या आणि जळजळ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT