Type 5 Diabetes Linked to Malnutrition sakal
आरोग्य

Malnutrition And Diabetes: शहरात आजपासून हॅलो डायबेटीज अकॅडमी परिषद; कुपोषणाशी संबंधित 'टाइप-५' मधुमेहावर नव्या संशोधनाची चर्चा

What is Type-5 Diabetes Linked to Malnutrition: शहरात हॅलो डायबेटीज अकॅडमी परिषदेला सुरुवात; कुपोषणाशी संबंधित दुर्मीळ 'टाईप-५' मधुमेहावर तज्ज्ञांची चर्चा.

सकाळ वृत्तसेवा

Rare Diabetes Types and Their Causes: लठ्ठ व्यक्तीला इतरांच्या तुलनेत मधुमेहाची जोखीम जास्त असते. मात्र मध्यम आणि कमी उत्पन्न गटांमधील लोकांमध्ये नवीन प्रकारचा डायबिटीस आढळत असल्याची माहिती पुढे आली आहे. याला मधुमेह टाईप ५ असे नाव असून यावर संशोधन सुरू आहे. सडपातळ लोकांमध्ये आढळणाऱ्या तसेच कुपोषणाशी संबंधित ''टाईप-५ डायबिटीस'' असे वर्गीकरण करण्यात येत असल्याचे मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणाले.

डायबेटिज केअर फाऊंडेशनतर्फे मधुमेहाशी संबंधित विषयांवर नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये शुक्रवारपासून (ता.६) तीन दिवसीय हॅलो डायबेटिज ॲकेडमिया परिषद होणार आहे. उद्‍घाटन रविवारी (ता.७) दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल.

आरोग्य सेवा नवी दिल्लीचे महासंचालक डॉ. रती मक्कर, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी, डॉ. बंशी साबू, डॉ. कमलाकर त्रिपाठी, डॉ. बी. एम. मक्कर, डॉ. अनुज माहेश्वरी, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. कविता गुप्ता, डॉ. जयराज कोरपे, डॉ. संकेत पेंडसे, डॉ. जयेश तिमाने, डॉ. स्वप्ना खानझोडे व देश-विदेशातील मान्यवर उपस्थित राहतील.

या पार्श्‍वभूमीवर डॉ. गुप्ता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले. या परिषदेत नव्या प्रकारातील टाईप-५ डायबिटीस कोणाला होतो? तो कसा होतो? नियंत्रणासाठी उपाययोजना यावर चर्चासत्र होईल.

वर्तणुकीच्या संयोजनातूनही मधुमेहाची जोखीम

लठ्ठपणा केवळ शारीरिक स्वरूपावर परिणाम करत नाही तर टाइप -२ मधुमेह हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, श्वसन विकार, स्नायूंचे विकार आणि कर्करोग अशा समस्यांनाही कारणीभूत ठरतो. लठ्ठपणा हा अनुवांशिक, पर्यावरणीय आणि वर्तणुकीय घटकांच्या संयोजनामुळेही होऊ शकतो. जीवनशैलीतील बदलाने लठ्ठपणा कमी करून भविष्यातील आजाराचे धोके कमी करता येतात, असे डॉ. गुप्ता म्हणाले.

परिषदेत काय होणार

- डायबेटिज ॲकेडमिया परिषदेत देश विदेशातील २५० तज्ज्ञ

- मधुमेहाशी संबंधित १२३ वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्र

- मधुमेहाशी संबधित विषयावर ४५ शोधप्रबंधाचे सादरीकरण

- मधुमेह नियंत्रणावर १२ कार्यशाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT