Norovirus symptoms and causes esakal
आरोग्य

Norovirus : सावध व्हा! नोरो व्हायरसचा वाढतोय धोका, कशी होते लागण? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

Norovirus symptoms and causes : नोरोव्हायरस एक अत्यंत संक्रामक रोग आहे, जो हिवाळ्यात जास्त पसरतो. या रोगाची लक्षणे आणि उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

Saisimran Ghashi

Norovirus infection : हिवाळ्यात नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतोय. अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालानुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 91 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही संख्या गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक आहे. नोरोव्हायरस वर्षभरात कधीही होऊ शकतो, पण नोव्हेंबर ते एप्रिल या काळात त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवतो.

लक्षणे कोणती आहेत?

नोरोव्हायरसची लक्षणे संक्रमित झाल्यानंतर 2 ते 48 तासांत दिसू लागतात आणि ती 1 ते 3 दिवस टिकू शकतात. सामान्यतः या लक्षणांमध्ये हे समाविष्ट असते:

  • उलट्या

  • पोटदुखी किंवा cramps

  • जुलाब

  • मळमळ

  • हलका ताप

  • स्नायू दुखणे

अधिक गंभीर प्रकरणांमध्ये हा आजार पाणी कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये.

नोरोव्हायरस कसा पसरतो?

नोरोव्हायरस हा कॅलिसिव्हिरिडे कुटुंबातील विषाणूमुळे होतो. हा विषाणू शरीरात प्रवेश केल्यावर पचनसंस्थेतील सूज वाढवतो, ज्यामुळे उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे दिसतात.

नोरोव्हायरस संसर्ग होण्याची कारणे

1. दूषित अन्न खाल्ल्यास

2. दूषित पाणी प्यायल्यास

3. दूषित पृष्ठभागाला हात लावून नंतर तोंडाला स्पर्श केल्यास

4. संक्रमित व्यक्तीच्या जवळ राहिल्यास

नोरोव्हायरस टाळण्यासाठी उपाय

  • हात स्वच्छ धुणे (साबण आणि पाणी वापरून)

  • दूषित अन्न आणि पाणी टाळणे

  • फळे व भाज्या नीट धुणे

  • माशांसारखे समुद्री खाद्य व्यवस्थित शिजवणे

  • दूषित भागाची योग्य स्वच्छता राखणे

नोरोव्हायरसचा प्रादुर्भाव सहजपणे टाळता येतो, फक्त काही मूलभूत स्वच्छता सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. हिवाळ्यातील या संसर्गजन्य आजाराला वेळीच ओळखा आणि त्यावर उपचार करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT