Office Yoga esakal
आरोग्य

Office Yoga : एकाच जागी बसून पाठीला रग लागते? ऑफीसमध्ये करा हा व्यायाम

अनेक जणांची पाठ, कंबर दुखते किंवा पाठीला रग लागते, त्यांच्यासाठी हे आसन आवश्यक आहे.

सकाळ डिजिटल टीम

Office Yoga : ऑफीसमध्ये एकाच जागी बसून ८-१० तास काम केल्याने पाठ, कंबर, मान, खांद्याची दुखणी अनेकांना लागतात. पण काही साधे सोपे व्यााम प्रकार केलेत तर तुम्हाला आराम मिळू शकतो. आणि कामाचा उत्साहसुद्धा वाढू शकतो.

आपण आज एक सोपा प्रकार पाहणार आहोत, त्याची दिवसातून ५-५ आवर्तने करणे खूप उपयोगी ठरेल. अनेक जणांची पाठ, कंबर दुखते किंवा पाठीला रग लागते, त्यांच्यासाठी हे आसन आवश्यक आहे.

असे करावे आसन

  • प्रथम खुर्चीत ताठ बसावे.

  • पायात साधारण खांद्याएवढे अंतर घ्यावे.

  • त्यानंतर श्वास घ्यावा व श्वास सोडत एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे वळावे. असे साधारण ५ वेळा करावे.

  • किमान ५ वेळा करायला त्रास होत असल्यास एक-दोन वेळा नक्की करावे, मात्र ५ ते १० सेकंद या स्थितीमध्ये स्थिर राहावे. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करावा.

आसनाचा फायदा

  • कंबर, पाठीचे स्नायू, शिरा मोकळ्या होतात. आखडत नाहीत. लवचिकता वाढते.

  • मणका लवचिक होऊन सशक्त होतो.

  • पोटाला पीळ बसल्याने पचनसंस्था, उत्सर्जनसंस्था, अंतःस्रावी ग्रंथी यांची कार्यक्षमता वाढते.

  • पचनाच्या तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन या त्रासांवर परिणामकारक आहे.

  • पोटावरील अतिरिक्त चरबी, तसेच वात कमी होतो.

  • ताण कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Mob kills young Hindu: संतापजनक! बांगलादेशात जमावाने आणखी एका हिंदू तरुणाचा बेदम मारहाण करून घेतला जीव

Christmas: चक्कर येऊन पडला सांताक्लॉज..., 'आप'च्या तीन बड्या नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल; चेष्टा करणं पडलं महागात

Crime: गुन्ह्यांचं शतक करायचं होतं, पण ५०० रुपयांच्या नोटेनं खेळ बिघडवला, तरुणाला तुरुंगवास घडवला, काय घडलं?

BSNL latest News : 'बीएसएनएल' ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ; कंपनी लवकरच 'ही' सेवा बंद करणार!

Latest Marathi News Live Update : एमजीएमच्या मैदानावर रंगणार नऊ दिवस सामने

SCROLL FOR NEXT