Office Yoga esakal
आरोग्य

Office Yoga : एकाच जागी बसून काम असल्याने पचनाच्या समस्या होताय? ट्राय करा हे आसन

सध्याच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीत सुरळीत जगण्यासाठी योगासने आपल्याला फार उपयुक्त ठरू शकतात.

धनश्री भावसार-बगाडे

Office Yoga For Better Diagetion : ऑफीस जॉब, बैठे काम यामुळे सहाजिकच हालचाली कमी होतात. ८ ते १० तास एकाच जागी बसून काम केल्याने अनेक शारीरिक आजार जडतात ही हल्लीच्या जीवनशैलीची शोकांतिका आहे. पण यावर पर्याय काय असा प्रश्न पडतो त्यावेळी योगा हे उत्तर मिळते. त्यामुळे सध्याच्या व्यस्त आणि तणावपूर्ण जीवनशैलीत सुरळीत जगण्यासाठी योगासने आपल्याला फार उपयुक्त ठरू शकतात.

एकाच जागी बसून काम असल्याने चयापचयावरही त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. अशावेळी हे आसन तुम्हाला मदत करू शकते. कसे ते बघूया.

हे बैठक स्थितीमधील आसन आहे.

असे करावे आसन

  • प्रथम दोन्ही पाय समोर करून बसावे.

  • त्यानंतर डावा पाय (पाऊल) उजव्या हाताने पकडून घ्यावे.

  • डावा पाय गुडघ्यात वाकवावा. थोडेसे कमरेतून पुढे वाकावे.

  • त्यानंतर उजव्या हाताने पाऊल थोडेसे वरच्या दिशेला घेऊन ते डाव्या दंडावर ठेवावे.

  • डाव्या पावलाचा तळपाय डाव्या दंडावर ठेवावा. तो ठेवल्यानंतर कंबरेतून उजव्या बाजूला वळावे.

  • डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडून हळू हळू उजव्या बाजूच्या मांडीकडील बाजूस जमिनीकडे वाकावे.

  • हनुवटी, छाती, पोट जमिनीला टेकविण्याचा प्रयत्न करावा.

  • आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा. श्वास संथ सुरू ठेवावा.

  • एका बाजूने आसन सोडले की दुसऱ्या बाजूनेही करावे.

आसनाचा फायदा

  • कंबर, पाठ, पोट यांना उत्तम पीळ बसतो.

  • त्यामुळे शरीराचा तो भाग अधिक लवचिक, कार्यक्षम व सशक्त होतो.

  • पचनाच्या तक्रारी, अपचन, ढेकर येणे, पोट फुगणे आदी त्रास कमी होतात.

  • खांदे, दंड अधिक सशक्त होतात. पायांची लवचिकता वाढते.

  • संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT