Office Yoga esakal
आरोग्य

Office Yoga : कामाचा ताण वाढल्याने लो फील होतंय? या आसनाने वाढेल आत्मविश्वास

मनावरचा ताण वाढला की, निराशा येऊन आत्मविश्वास कमी झाल्याचं जाणवतं.

सकाळ डिजिटल टीम

मनाली देव

Yoga For Increase Confidence And Reduce stress : धकाधकीचं जीवन आणि कामाबरोबर मनावर वाढणारा ताण यामुळे अनेक मानसिक आणि शारीरिक आजार जडतात. पण स्वतःसाठी थोडासा वेळ काढला तर तुम्ही या त्रासातून नक्कीच सहज बाहेर पडू शकतात. यासाठी काही आसन प्रकार करणे गरजेचं असतं.

योग जीवन : अनुपार्श्व कोनासन

हे बैठकस्थितीमधील आसन आहे.

असे करावे आसन

  • प्रथम दोन्ही पाय सरळ करून बसावे.

  • नंतर एक पाय गुडघ्यात वाकवून आतल्या बाजूला घ्यावा.

  • दुसरा पाय मागच्या बाजूला घेऊन गुडघ्यात वाकवावा.

  • त्यानंतर हाताच्या आधाराने वरच्या दिशेला घ्यावा.

  • डावा पाय मागच्या बाजूने गुडघ्यात वाकवला असल्यास डाव्या हाताच्या जवळच कोपरात डावे पाऊल अडकवावे. उजवा हात पुढून वर घ्यावा.

  • दोन्ही हात वरच्या दिशेला घेतल्यावर बोटे एकमेकांत गुंफावीत किंवा पकडावीत.

  • मान थोडीशी वरच्या दिशेला घ्यावी.

  • आसनस्थितीमध्ये श्वास संथ सुरू ठेवावा.

  • खूप ताण देऊन सुरुवातीला आसन करू नये.

  • एका बाजूने झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही करावे.

आसनाचे फायदे

  • संपूर्ण शरीराला ताण बसतो.

  • खादे, पाठ, कंबरेचे स्नायू लवचिक व सशक्त होतात.

  • छाती व पोटाच्या भागाला ताण बसल्याने तेथील अवयव, इंद्रिये अधिक कार्यक्षम होतात.

  • फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

  • मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.

  • आत्मविश्वास वाढविण्यासाठी, पोश्चर सुधारण्यासाठी आसन उपयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: उजनी धरणातून विसर्ग वाढविला, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT